गॅस पाइपलाइनसाठी खोदताना पंचगंगेची पाइपलाइन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:31+5:302021-04-14T04:22:31+5:30
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा योजनेच्या पाइपलाइनला रवींद्रनाथ टागोर वाचनालय येथे मोठी गळती लागली आहे. गॅस जोडणीची पाइपलाइन ...

गॅस पाइपलाइनसाठी खोदताना पंचगंगेची पाइपलाइन फुटली
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा योजनेच्या पाइपलाइनला रवींद्रनाथ टागोर वाचनालय येथे मोठी गळती लागली आहे. गॅस जोडणीची पाइपलाइन जोडण्यासाठी खोदकाम करताना पाण्याची पाइपलाइन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. पुन्हा पाण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या शहरात अनेक ठिकाणी गॅस पाइपलाइन बसविण्याचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी नवीन रस्ते करण्यात आले आहेत, त्याठिकाणी थेट खोदकाम न करता मशीनद्वारे पाइपलाइन टाकली जात आहे. त्याच पद्धतीने येथील रवींद्रनाथ टागोर वाचनालय परिसरात काम सुरू असताना पंचगंगेच्या मुख्य पाइपलाइनला धक्का लागून ती फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून, रस्ताही खचला आहे. याची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे व बाजी कांबळे यांनी धाव घेतली. त्यानंतर पंचगंगा नदीतील पाणी उपसा बंद करण्यात आला. यावेळी सभापती सुर्वे यांनी नगरपालिकेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले, तरी काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.
फोटो ओळी
१३०४२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत गॅस जोडणीची पाइपलाइन जोडण्यासाठी खुदाई करताना पाण्याची पाइपलाइन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.