शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:00 IST

तात्यांना भेटायला नागरिकांची रीघ लागली

रमेश पाटीलकसबा बावडा (कोल्हापूर): मी विठ्ठलाचा भक्त. पंढरीची वारी माझी कधीही चुकली नाही. विठ्ठलामुळेच माझा पुनर्जन्म झालाय. त्यामुळे संक्रांत अन् गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरांना विचारून पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणार. हे शब्द आहेत मृत घोषित केलेल्या पांडुरंग रामा उलपे उर्फ पांडू तात्या यांचे.झाले असे की, पांडू तात्यांना पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नातेवाईकांनी दवाखान्यात हलवले. पण उपचार सुरू असतानाच पांडू तात्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पै पाहुण्यांना निरोप देण्यात आले. पै पाव्हणे घरी जमू लागले. तात्यांना घरी घेवून जात असतानाच रस्त्यात ॲम्बुलन्स खड्ड्यात आदळली. या धक्क्याने तात्यांची काहीशी हालचाल सुरू झाली. ही गोष्ट लक्षात येताच त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. तब्बल दोन आठवड्याच्या उपचारानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.कसबा बाबड्यातील पांडू तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे पांडू तात्या नेहमीप्रमाणे घरी देवाची पूजा करत असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. पत्नी बाळाबाई यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना हाका मारल्या. लगेचच त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यानंतर काही वेळातच नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. दरम्यान, तात्यांना ॲम्बुलन्समधून घरी आणताना त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. पुन्हा उपचार सुरू झाले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी रीघ लागली आहे. संक्रांत झाल्यानंतर लगेचच पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची तात्या सांगत होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDeathमृत्यू