शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

दहावी परीक्षेत क्रीडा गुण देताना चूक; विभागावर खेळला तरी दिले पाचच गुण, कोल्हापूर विभागातील २७८ विद्यार्थ्यांवर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:02 IST

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण देताना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील जिल्हा व विभागावर ...

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण देताना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील जिल्हा व विभागावर खेळलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिल्याने विभाग पातळीवर खेळलेल्या २७८ विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. याबाबतची तक्रार शाळांसह विद्यार्थ्यांनी केल्यानंतर आता बोर्डाने ही चूक मान्य करत या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांसह सुधारित गुणपत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.कोल्हापूर विभागीय मंडळात २ हजार ३२७ शाळा असून, ३५७ परीक्षा केंद्रांवर १ लाख २९ हजार ४२१ पैकी १ लाख २५ हजार ३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील ४ हजार ४०० विद्यार्थ्यांनी क्रीडा गुण मिळण्यासाठी अर्ज केले होते. यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता. जिल्हापातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्याला पाच, तर विभाग व राज्यपातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना दहा ते बारा गुण व राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस गुण दिले जातात. दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २७८ विद्यार्थी हे विभाग पातळीवर खेळले आहेत. तशी प्रमाणपत्रेही या विद्यार्थ्यांनी क्रीडा गुण मिळण्यासाठी केलेल्या अर्जासोबत जोडली आहेत. मात्र, बोर्डाने या सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पाच गुण दिल्याचे विद्यार्थी व शाळांच्या लक्षात आले. त्यांनी बोर्डाकडे तक्रार केल्यानंतर आता गुणपत्रिका बदलून देण्याची तयारी बोर्डाने दाखवली आहे.

विभाग पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हापातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांइतके गुण दिले गेले आहेत. ही तांत्रिक चूक असून, आम्ही ती सुधारत आहोत. या विद्यार्थ्यांना आवश्यक गुण देत गुणपत्रिका सुधारित देण्याची प्रक्रिया सुरू आहे. - सुभाष चौगुले, सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी