कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल

By Admin | Updated: September 5, 2014 00:20 IST2014-09-05T00:15:17+5:302014-09-05T00:20:30+5:30

-पौराणिक गणेशमूर्ती..तांत्रिक देखावा ..लईडीच्या माध्यमातून गणेशदर्शन

Where will you see Ganapati and scenes in Kolhapur? | कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल

कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल


राजारामपुरी  --राजारामपुरीत यंदाही तांत्रिक देखाव्यांना पसंती
राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील शिवाजी तरुण मंडळातर्फे वेरुळ येथील कैलास मंदिराची ४० फूट उंच प्रतिकृती.
राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील राजारामपुरी स्पोर्टस्तर्फे ‘पंढरीची वारी’ हा तांत्रिक देखावा
राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील एकता मित्रमंडळातर्फे सांगाड्याचा नृत्य हा देखावा केला आहे.
राजारामपुरी चौथ्या गल्लीतील जय मराठा तरुण मंडळातर्फे जय मल्हार हा तांत्रिक देखावा केला आहे.
राजारामपुरी सहाव्या गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळातर्फे ‘श्रीकृष्णलीला’ हा तांत्रिक देखावा केला आहे.
राजारामपुरी सातव्या गल्लीतील न्यू फ्रेंडस् सर्कलने लेटस् डेकोरेशन साकारले आहे.
राजारामपुरी आठव्या गल्लीतील सेव्हन कलर्स फ्रेंड सर्कलतर्फे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा प्रबोधनात्मक देखावा केला आहे.
राजारामपुरी आठव्या गल्लीतील श्री राजारामपुरी तरुण मंडळाने अ‍ॅग्री बर्ड हा देखावा तयार केला आहे.
राजारामपुरी दहाव्या गल्लीतील गोकुळ फ्रेंडस् सर्कलने एलईडीच्या माध्यमातून गणेशदर्शन हा देखावा केला आहे.
राजारामपुरी अकराव्या गल्लीतील युवक मित्रमंडळाने जलसंवर्धनावर आधारित सजीव देखावा केला आहे.
राजारामपुरी भाजी मंडई येथील श्री शाहूनगर मित्रमंडळाची २१ फुटी इको फ्रेंडली गणेशमूर्ती.
राजारामपुरी शाहू मिल चौक येथे श्री हनुमान तालीम मंडळातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित सजीव देखावा केला आहे.
लक्ष्मीपुरी
विश्वशांती ग्रुप : २१ फुटी गणेशमूर्ती.
देशप्रेमी ग्रुप : राक्षसाशी युद्ध करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती.
शिवशक्ती तरुण मंडळ : आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट
कट्टा ग्रुप : नृत्य करणारा श्री गणेश
फायटर्स ग्रुप : राधा-कृष्णाची रासलीला
उमा चौक तालीम मंडळ : तानाजी मालुसरेंची यशवंती घोरपड
शाहूपुरी
युवक क्रांती दल (दुसरी गल्ली) : हत्ती सायकल चालवत असलेला तांत्रिक देखावा
श्री गणेश तरुण मंडळ (चौथी गल्ली) : डोरेमॉनचा देखावा
शाहूपुरी गणेश मंडळ (तिसरी गल्ली) : अंधश्रद्धा निर्मूलनाची गुहा
शाहूपुरी बॉईज (पाचवी गल्ली) : लालबागचा राजा गणेशमूर्ती
एकता क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (पाचवी गल्ली) : शाहूपुरीचा राजा गणेशमूर्ती
आर ग्रुप (सहावी गल्ली) : परशुराम-बालगणेशाचे युद्ध
गोल्डन तरुण मंडळ (सहावी गल्ली) : पौराणिक गणेशमूर्ती

Web Title: Where will you see Ganapati and scenes in Kolhapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.