शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे मंत्री कोठे आहेत?, समरजीत घाटगे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:54 IST

राजर्षी शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या वंशाचा विसर पडला आहे.

कोल्हापूर : दाऊदशी संबंध असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाई विरोधात रस्त्यावर उतरणारे महाविकास आघाडीचे मंत्री आता कोठे आहेत? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला.घाटगे यांनी रविवारी खासदार संभाजीराजे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, समरजीत घाटगे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या वंशाचा विसर पडला आहे. समाजाने मागण्या तरी काय केल्या? मनात आणले तर पाच मिनिटांत त्यांची पूर्तता करता येऊ शकते.मात्र, या सरकारला जाणीवपूर्वक ते करायचे नाही. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरते आणि खासदार संभाजीराजे गेले दोन दिवस उपोषणाला बसले असताना तिथे भेट द्यायला वेळ नाही, कोठे आहेत राष्ट्रवादीचे नेते? ही खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे. राज्य सरकारच्या भूमिकेचा आपण निषेध करीत आहे. संभाजीराजे यांची प्रकृती खालावत आहे. सरकार दाद देणार नसेल तर आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही घाटगे यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती