शिंगणापूरचा वादग्रस्त ‘आनंद’ बार कधी बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:21+5:302021-03-25T04:22:21+5:30

कोपार्डे : शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेसमोरच असलेल्या आनंद बीअर बारच्या विरोधात येथील बीअर बारविरोधी कृती समितीने ...

When will Shinganapur's controversial 'Anand' bar close? | शिंगणापूरचा वादग्रस्त ‘आनंद’ बार कधी बंद होणार

शिंगणापूरचा वादग्रस्त ‘आनंद’ बार कधी बंद होणार

कोपार्डे : शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेसमोरच असलेल्या आनंद बीअर बारच्या विरोधात येथील बीअर बारविरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे २०१९ मध्ये तक्रार केली होती. त्यावर मार्च २०२० मध्ये सुनावणी झाली; पण लॉकडाऊन सुरू झाल्याने निर्णय प्रलंबित राहिला. मंगळवारी (दि. २३) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने येथे छापा टाकूून ५१ हजार रुपयांंची दारू जप्त केल्यामुळे हा वादग्रस्त बार पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा बार बंद करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शिंगणापूर येथील प्राथमिक शाळेच्या समोर आनंद परमिट रूम व बीअर बार सुरू आहे. या बारची मालकी वंदना आनंद मस्कर या महिलेेच्या नावे असल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागवकडे आहे. शाळेसमोर बारला परवानगी दिल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन बीअर बारविरोधी कृती समिती तयार केेली. बीअर बार परवान्यासाठी जोडलेली कागदपत्रे व प्रत्यक्षात वस्तुस्थिती यात मोठी तफावत आढळून आली. बीअर बारशेजारील पडक्या खोलीतून बेकायदेशीर देशी दारू विक्री होत असल्याचेही पुरावे कृती समितीने मे २०१९ मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दिले होते. या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर यांना आदेश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरुवातीला चालढकल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कृती समितीने सतत पाठपुरावा करायला सुरुवात केल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणीला सुरुवात झाली. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्याने अद्यापही याबाबत अंतिम निर्णय जाहीर झाला नाही.

मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या बीअर बारवर छापा टाकून ५१ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त केली.

कोट :

या बीअर बारवर यापूर्वीही दोन-तीन वेळा छापा टाकण्यात आला असून, बेकायदेशीर दारूसाठा आढळल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बीअर बारचा परवाना रद्द करावा. दीपक कांबळे (निमंत्रक- बीअर बारविरोधी कृती समिती, शिंगणापूर)

फोटो : २४ शिंगणापूर बीअर बार

१) व २) शिंगणापूर, तालुका करवीर येथे प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच आनंद बीअर बार आहे.

Web Title: When will Shinganapur's controversial 'Anand' bar close?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.