निसर्गसंपन्न चंदगडचे मागासलेपण संपणार कधी?
By Admin | Updated: November 11, 2014 23:26 IST2014-11-11T21:12:23+5:302014-11-11T23:26:19+5:30
नव्या सरकारकडून अपेक्षा : दौलत कारखाना बंदच, एव्हीएच वादात, हत्तींचा धुमाकूळ सुरूच !--चंदगड तालुका

निसर्गसंपन्न चंदगडचे मागासलेपण संपणार कधी?
राम मगदूम - गडहिंग्लज -तीन वर्षांपासून दौलत सहकारी साखर कारखाना बंद आहे. पर्यटन व्यवसायाला अनुकूलता असतानाही इथल्या तरुणांना मुंबई-पुण्याच्या हॉटेलमध्ये मजुरी करावी लागते. जंगली श्वापदांसह हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे.
‘एव्हीएच’वादात सापडला, नवीन उद्योगांचा पत्ता नाही, असे आजचे चित्र आहे. मुळातच निसर्गसंपन्न असूनदेखील चंदगडच्या माथी अद्याप मागासलेपणाचा शिक्का आहे. गटबाजी व वर्चस्ववादाच्या राजकारणात झालेली तालुक्याच्या विकासाची कोंडी फुटणार कधी? आणि चंदगडचा मागासलेपणा संपणार कधी, हाच खरा प्रश्न आहे.
१९७०च्या दशकात स्व. व्ही. के. चव्हाण-पाटील यांनी दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याला मंजुरी मिळविली. त्यानंतर नरसिंगराव पाटील यांनी कारखाना साकारला. कारखान्याच्या माध्यमातून उच्च माध्यमिक व पदवी शिक्षणाची सोय केली. तंत्रशिक्षणाची गरज ओळखून ‘पॉलिटेक्निक’ही सुरू केले. मात्र, तेही बंद पडले. आता कारखानाही बंद पडला आहे. खेडूत, नव महाराष्ट्र, शारदा व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांनी शिक्षण प्रसारात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे चंदगड गुणवंतांची खाण म्हणून ओळखली जाते. मात्र, नेतृत्वाकडे विकासाचा दृष्टिकोनच नसल्यामुळे पोटापाण्यासाठी भटकंतीची वेळ तरुणांवर आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह कोकण व गोव्यातदेखील चंदगडचे हॉटेल कामगार दिसतात.
गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर वसलेल्या चंंदगडशेजारी कोकणची किनारपट्टी आहे. देश-विदेशातून पर्यटनासाठी येणारे पर्यटक ‘चंदगड’ ओलांडूनच कोकणात व गोव्यात जातात. चंदगडचे निसर्गसौंंदर्य, ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन, अस्सल तांबडा-पांढऱ्या रश्श्यासह काजू, करवंदे, फणस हा रानमेवा चाखण्यासाठी पर्यटकांना ‘चंदगड’चा मुक्काम घडवता येईल. परराज्यात व जिल्ह्यात कामगार म्हणून राबणाऱ्या मुलांना स्वत:च्या हा
काजू, रताळे व बटाट्याला हमीभाव हवा
देशातील एक नंबरचा काजू चंदगडमध्ये पिकतो. रताळा व बटाट्याचे उत्पन्नही विक्रमी होते. भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो.
मात्र, विक्रीसाठी शेतकऱ्यांना बेळगावच्या बाजारावर अवलंबून राहावे लागते. काजू, रताळा व बटाट्याच्या हमीभावासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतीमालाचे सौदे सुरू करायला हवेत.
पर्यटनस्थळांचा विकास
ऐतिहासिक किल्ले पारगडासह गंधर्वगड, कलानंदीगड व महिपाळगडाचा विकास.
स्वामीकार रणजित देसार्इंच्या वाड्याचा विकास व
त्यांच्या स्मारकाची उभारणी.
प्रतिमहाबळेश्वरची स्वप्नपूर्ती
स्व. बाबासाहेब कुपेकरांनी चंदगडच्या पर्यटनक्षेत्र
विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. आंबोली, चौकुळ व तिलारीनगर हा पर्यटनाचा
त्रिकोण विकसित करून प्रतिमहाबळेश्वर निर्माण करण्याची घोषणा वेळोवेळी त्यांनी केली होती, त्याची पूर्तता व्हायला हवी.
टेलचा मालक बनवता येईल. यासाठी सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून तालुक्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांच्या विकासाला व्यावसायिकतेची जोड द्यायला हवी. यासाठी राज्यकर्त्यांसह ‘चंदगडी’ मानसिकता बदलायला हवी.
रस्ते बांधणी
बेळगाव-वेंगुर्ला आणि गडहिंग्लज-चंदगड या राज्यमार्गांची पुनर्बांधणी करायला हवी. पर्यटनाच्यादृष्टीने हे रस्ते दोन पदरी करण्याबरोबरच चंदगड तालुक्यातील गावजोड रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची बांधणी करायला हवी.
तालुक्यातील
मूलभूत सुविधा
११० महसुली गावांसह १५५ वाड्यावस्त्यांच्या विस्तीर्ण डोंगरी व दुर्गम तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दळणवळणासाठी रस्ते व आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आजही कायम आहे.
ऐरणीवरील प्रश्न
३ वर्षे बंद पडलेला दौलत कारखाना सुरू करणे.
वादग्रस्त व न्यायप्रविष्ट ‘एव्हीएच’ प्रकल्पाचा निर्णय करून औद्योगिकरणास चालना देणे.
जंगली हत्तींसह हिंस्र श्वानपदांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना संरक्षण देणे.
रखडलेले प्रश्न
तालुका क्रीडासंकुल
जंगमहट्टी, फाटकवाडी व झांबरे प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन
चंदगडची रताळी-चंदगडचा काजू