शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, चंद्रकांत पाटील एकत्र येतात तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:31 IST

Politics Kolahpur : सरकारमधील काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शनिवारी काही वेळ एकत्र होते. या तिघांमध्ये कोरोना, लॉकडाऊन आणि अधिवेशन या विषयावर दिलखुलास चर्चा रंगली. चर्चेवेळी सत्ताधारी मंत्री आणि आमदार पाटील यांनी एकमेकांचे हळूवार चिमटे काढले.

ठळक मुद्देमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यात रंगली दिलखुलास चर्चा कोरोना, लॉकडाऊन, अधिवेशनावर एकमेकांनी काढले हळूवार चिमटे

कोल्हापूर : सरकारमधील काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शनिवारी काही वेळ एकत्र होते. या तिघांमध्ये कोरोना, लॉकडाऊन आणि अधिवेशन या विषयावर दिलखुलास चर्चा रंगली. चर्चेवेळी सत्ताधारी मंत्री आणि आमदार पाटील यांनी एकमेकांचे हळूवार चिमटे काढले.कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथे राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी हे तिघेजण शनिवारी आले होते. सकाळी साडेसातला लक्ष्मी विलास पॅलेस येथे पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व सरकारी अधिकारी उपस्थित होते. हे सर्वजण खासदार संभाजीराजे छत्रपती यांची वाट पाहत होते.यादरम्यान, चंद्रकांत पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात कोरोना, लॉकडाऊन यांच्यात चर्चा सुरू झाली. यावर मंत्री मुश्रीफ यांनी शहर, जिल्ह्यात ७० टक्केपेक्षा अधिक जणांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आणि सर्व व्यवहार खुले करायचे, असे सूचवले. निर्बंधास व्यापारी, व्यावसायिक वैतागले असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारने ऑनलाईनपणे पूर्ण दिवस अधिवेशन घ्यावे, असे मत मांडले. असे झाल्यास विरोधकांना प्रश्न विचारता येईल आणि सत्ताधाऱ्यांना उत्तरही देता येईल, असे ते म्हणाले. यावर पालकमंत्री सतेज पाटील अशाप्रकारे अधिवेशनघेतल्यास नियंत्रण ठेवणे अडचणीचे होईल, असे सांगितले. अशी सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा रंगली असतानाच खासदार संभाजीराजे यांचे आगमन झाले.

सर्वजण राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मात्र मराठा आरक्षण, ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते आणि सत्ताधारी आघाडीतील दोन मंत्री एकत्र येत संयमाने , दिलखुलास केलेली चर्चा लक्षवेधी ठरली.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर