तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:42+5:302021-04-16T04:25:42+5:30

गडहिंग्लज : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याशी मनात आहे, त्यासाठी मी ‘गोकूळ’चे नेते महादेवराव महाडिक ...

What is in your mind is in my mind | तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात

तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात

गडहिंग्लज : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याशी मनात आहे, त्यासाठी मी ‘गोकूळ’चे नेते महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे आग्रहपूर्वक शिष्टाई करू, अशी ग्वाही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथे गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण गटाच्या गोकूळ ठरावधारकांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबूराव मदकरी होते.

चव्हाण म्हणाले, महाडिक यांनी शब्द दिल्यामुळेच ठरावधारकांच्या पाठिंब्यावर आपण उमेदवारी दाखल केली आहे. गडहिंग्लजमधून आपल्यासह सदानंद हत्तरकी यांनाही उमेदवारी मिळावी.

यावेळी अ‍ॅड. सुभाष शिंदे, अ‍ॅड. सुभाष डोंगरे, सदाशिव पाटील, रामू भनगे, अनुुप पाटील, भीमगोंडा पाटील, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, रमेश रिंगणे, रमेश आरबोळे, आबासाहेब देसाई, रवींद्र शेंडुरे, किरण पाटील, सतीश शिरूर, विजय फुटाणे आदी उपस्थित होते. चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.

Web Title: What is in your mind is in my mind