शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

सकाळी किती वाजता उठता, रात्री कधी झोपता..?; केंद्र सरकार करणार सर्वेक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 12:02 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : तुम्ही सकाळी किती वाजता उठता, दिवसभर काय करता, रात्री किती वाजता झोपता याचे सर्वेक्षण आता ...

समीर देशपांडे

कोल्हापूर : तुम्ही सकाळी किती वाजता उठता, दिवसभर काय करता, रात्री किती वाजता झोपता याचे सर्वेक्षण आता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून (दि. १ जानेवारी) देशभरामध्ये हे सर्वेक्षण होणार असून त्यासाठीची प्रश्नावली ही तयार करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण चालेल. ‘ वेळेचा उपयोग सर्वेक्षण ’ असे याला नाव देण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या या विभागाच्या वतीने १९५० पासून विविध प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात. सध्या उद्योग, गृह, सूक्ष्म, लघु, मध्य व कुटिल उत्पादने, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील सर्वेक्षण सध्या देशभरामध्ये सुरू आहे. आता यामध्ये या नव्या सर्वेक्षणाची भर पडली आहे. त्यानुसार आता या विभागाचे सर्वेक्षक संबंधित घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची माहिती संकलित करतील. त्यामध्ये पूर्ण नाव, पत्ता,व्यवसाय, नोकरी, संपर्क क्रमांक ही सर्व वैयक्तिक माहिती भरून घेतली जाईल.

याचबरोबर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय आणि किती वेळ करते याची सविस्तर नोंद घेण्यात येणार आहेत. किती वाजता उठता इथंपासून मग सकाळची आवराआवर झाल्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी किती वेळ जाता, तिथे किती वेळ काम करता, घरी कधी येता, संध्याकाळी दूरचित्रवाणी पाहण्यापासून ते कुटुंबासोबत किती वेळ घालवता, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी किती प्रवास करावा लागतो याची माहिती संबंधितांकडून घेण्यात येणार आहे.घरच्या शेती, जनावरांपासून ते पारंपरिक व्यवसाय पर्यंतची सर्व माहिती यामध्ये घेतली जाईल. अगदी गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिला २४ तासात किती वेळ आणि कोणते काम करतात याचीही इत्यंभूत माहिती घेतली जाणार आहे.

गावातील, वाॅर्डातील १४ कुटुंबांचे सर्वेक्षणप्रत्येक गावातील आणि मोठ्या शहरातील प्रत्येक वॉर्डातील १४ कुटुंबांचे अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहाटे चार ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार या काळात या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती किती वेळ, कोणते काम करते याचे संकलन या सर्वेक्षणातून करण्यात येणार आहे. यामध्ये अगदी मोबाइलवर ही किती वेळ जातो हे देखील तपासले जाणार आहे.

वेळेचा उपयोग याबाबतचे हे सर्वेक्षण होणार असून यासाठी घरी आलेल्या सांख्यिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. या सर्वेक्षणाचा देशाची धोरणे ठरवण्यासाठी उपयोग होत असल्याने सत्य माहिती द्यावी. - आर. डी. मीना वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMobileमोबाइलCentral Governmentकेंद्र सरकार