शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:11 IST

दोषी नव्हता तर पळून का गेला?

कोल्हापूर : ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वास पुढे आणून पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. अशा कागलचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय वक्तव्य करीत आहेत. त्यांनी या थोर पुरुषांच्या विचारांचा अपमान केल्याचा आरोप ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला.गडहिंग्लज येथील कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी ‘समरजीत घाटगे यांच्याबद्दल ‘भिकारी’ हा शब्द वापरला होता. यावर, घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पुरोगामी कोल्हापुरातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का? यापूर्वी दिवंगत विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, आप्पासाहेब नलवडे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले. पण त्यांनी कधी अशी पातळी सोडली नाही. वारंवार शाहू महाराजांच्या कागलचा अपमान ते करत असून याच राजघराण्याने त्यांना राजकारणात आणले हे ते विसरले का?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बदल्यांच्या दलालीचा आरोप हसन मुश्रीफ करत आहेत. पण, उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळी कोल्हापुरात येतील, त्यावेळी त्यांना जरूर विचारू. निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाही मुश्रीफ यांची ही अवस्था झाली आहे. ही निवडणूक हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्यात राहिली नाही तर मुश्रीफ विरुद्ध ‘कागल’ची स्वाभिमानी जनता, अशी लढत होणार असल्याने ही निवडणूक हातून सुटल्याचा अंदाज त्यांना आला आहे.

दोषी नव्हता तर पळून का गेला?सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले ४० कोटी हसन मुश्रीफ यांनी खाल्ल्याचा आरोप आपण केला होता. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तुरुंगवास इतर गोष्टी पुढच्या होत्या, मात्र त्या आधीच ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेले. दोषी नव्हता, तर ‘ईडी’चे पथक आल्यानंतर पाठीमागच्या दाराने पळून का गेला? असा सवाल समरजीत घाटगे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ