काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 07:53 IST2025-05-02T07:53:08+5:302025-05-02T07:53:30+5:30

लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या.

What can I say Love is with one person marriage is with her friend | काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

कोल्हापूर : नोकरीच्या निमित्ताने सध्या पुण्यात राहाणारा ओंकार उत्तम प्रधान (वय २२, मूळ रा. कारंडेवाडी, ता. करवीर) याने लग्नाचे आमिष दाखवून, प्रेमाच्या आणाभाका घेत एका मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवले. मात्र, काही दिवसांत तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने कोडोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केल्याने ओंकारची वरात थेट पोलिस ठाण्यात पोहोचली.

लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या. जेमतेम १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या ओंकारने पुण्यातील कंपनीत काम करतो. इन्स्टाग्रामवरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली. प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिला संसाराची स्वप्ने दाखवली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला. दरम्यानच्या काळात त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीशी सूत जुळवले व आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्नही केले.

हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला.

Web Title: What can I say Love is with one person marriage is with her friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.