विमानतळावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST2021-03-15T04:23:41+5:302021-03-15T04:23:41+5:30
उचगाव : उजळाईवाडी (ता .करवीर) कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. विठ्ठल पाटील शिक्षण ...

विमानतळावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांचे स्वागत
उचगाव :
उजळाईवाडी (ता .करवीर)
कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. विठ्ठल पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, इमान धामणी (ता. मिरज, जि. सांगली) येथील 'राजमाता जिजाऊ आदर्श आई' पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा नियोजित दौरा होता. कार्यक्रमासाठीे त्यांचे हैदराबादमार्गे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी कोल्हापूर विमानतळावर गर्दी केली होती. यावेळी आरपीआयचे उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, बाळासाहेब वाशिकर, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे, दिलीप कांबळे, संजय जिरगे, रूपाताई वायदंडे, अंजली कांबळे, रमेश हिंगे, नितीन कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
(छाया : मोहन सातपुते)