‘सखी मंच’तर्फे उद्या ‘वेलकम सखी’: सदस्यता नोंदणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:49 IST2020-01-29T12:46:25+5:302020-01-29T12:49:40+5:30
कोल्हापूर : महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांना मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा बहारदार नजराणा असणाऱ्या ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने नवीन वर्षाची ...

‘सखी मंच’च्या नवीन वर्षातील सदस्यता नोंदणी अंतर्गत देण्यात येणाऱ्या गिफ्टचे अनावरण मंगळवारी विभाग प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूर : महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांना मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा बहारदार नजराणा असणाऱ्या ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात ‘वेलकम सखी २०२०’ या कार्यक्रमाने करण्यात येणार आहे. नवीन वर्ष सदस्यता नोंदणीअंतर्गत उद्या, गुरुवारी डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी विशाल सुतार यांच्या ‘झंकार’ प्रस्तुत ‘स्वागत सप्तसुरांनी’ या सदाबहार गीतांचे सादरीकरण होईल. तसेच लावणीसम्राज्ञी मृणाल कुलकर्णी यांचा नृत्याविष्कार होणार आहे. यावेळी सखींना २०२० सालची सदस्यता नोंदणी करता येणार आहे.
‘सखी मंच’तर्फे वर्षभर महिलांसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांना रोजच्या दिनक्रमातून काही वेळ स्वत:साठी देता यावा, त्यांना कार्यक्रमांचा मुक्तपणे आस्वाद घेता यावा व आपल्यातील कलागुण सादर करता यावेत, हा उद्देश ठेवून हे मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजिले जातात. म्हणूनच ‘सखी मंच’ने महिलांच्या मनामनांत स्थान मिळविले आहे. सखींनी २०१९ मध्ये बक्षिसांची बरसात आणि दर्जेदार कार्यक्रमांचा लाभ घेत, हे वर्ष साजरे केले.
उद्या, गुरुवारी सादर होणारा हा कार्यक्रम नवीन वर्षातील पहिलाच कार्यक्रम असून, त्याद्वारे सखींचे स्वागत करून सदस्य नोंदणीस प्रारंभ होणार आहे. तसेच यावर्षीसुद्धा सखींना वर्षभर भरपूर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९७३००७४०२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अॅडव्हान्स सदस्यता नोंदणी सुरू
‘सखी मंच’ची २०२० सालची अॅडव्हान्स नोंदणी आज, बुधवारपासून सुरू होत आहे. ‘लोकमत’ कार्यालयात अथवा तुमच्या जवळच्या विभाग प्रतिनिधीकडे ५०० रुपये भरून, तुम्ही या वर्षीची सखी सदस्य नोंदणी करू शकता. याअंतर्गत देण्यात येणारी बक्षिसे व सेवा-सुविधा काही दिवसांनी सदस्यांना दिल्या जातील.
प्रत्येक सदस्याला मिळणार
- रु. ८००/- चे बाथरूम ४ पीस सेट
- शेफ विष्णू मनोहर यांचे सिक्रेट रेसिपी बुक
- आकर्षक ओळखपत्र. आकर्षक कुपन बुक
- ‘अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर’कडून वाढदिवसानिमित्त दोन पीस फॅन्सी बँगल्स
- वाढदिवसाला ‘हॉटेल वेलची’कडून १ थाळी मोफत
- लग्नाच्या वाढदिवसाला हॉटेल खवय्याकडून १ थाळी मोफत
- ‘लॅशेस ब्यूटी स्पा’ आणि ‘मेकअप’ यांच्याकडून अॅडव्हान्स हेअर कट फ्री
- ‘अंकीज ब्यूटी सलून’ यांच्याकडून क्लीनअप फ्री ‘सायली ब्यूटी पार्लर’ यांच्याकडून आयब्रो आणि फेसपॅक फ्री
- ‘डॉ. इंगळे डेंटल क्लिनिक’ यांच्याकडून डेंटल चेक अप फ्री
- ‘समर्थ फोटो स्टुडिओ’कडून ५ बाय ७ चा फोटो मोफत
- ‘मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस’कडून कोर्सच्या फीमध्ये ५०० रुपयांची सूट
- ‘ओम शिवसूमन मोटार ड्रायव्हिंग स्कूल’कडून कोर्स फी मध्ये १५ % सूट
- ‘आॅरगॅनिक इंडिया’कडून ‘ग्रीन टी’ मोफत
भाग्यवान सोडतीची बक्षिसे अशी
- ‘लकी फर्निचर’कडून १ सोफा
- ‘लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेस’कडून १ सोलर वॉटर हिटर
- ‘फर्न लँड’कडून १ सखीला रु. २० हजारांचे सरप्राईझ गिफ्ट
- ‘गौरव एंटरप्रायझेस’कडून २ आटाचक्की
- ‘डी. एस. सिल्व्हर’ यांच्याकडून १५ चांदीचे छल्ले
- ‘नारी द फॅशन हब’ यांच्याकडून १० गिफ्ट हॅम्पर
- ‘शुभांगी सिल्क आणि सारीज’कडून १० साडी
- ‘बालाजी स्टोअर’कडून ५ मनगटी घड्याळ