कोगनोळीत गांधीगिरी, टोल चुकवून जाणाऱ्या वाहनांचे फुल देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:18 PM2021-02-03T12:18:39+5:302021-02-03T12:27:20+5:30

tollplaza Highway Kolhapur- राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी अनेक वाहने कोगनोळीतून धोकादायक प्रवास करतात. या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून कोगनोळीकर आक्रमक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज टोल चुकवून गावातून प्रवास करणाऱ्या वाहनांचे गुलाब पुष्प देऊन उपरोधिक स्वागत करण्यात आले.

Welcome to Koganoli by giving flowers to the vehicles passing through the village by paying the agitation toll in Gandhigiri style | कोगनोळीत गांधीगिरी, टोल चुकवून जाणाऱ्या वाहनांचे फुल देऊन स्वागत

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकवून अवैधरीत्या कोगनोळीतून प्रवास करणाऱ्या वाहनांचे गुलाब पुष्प देऊन उपरोधिक स्वागत करण्यात आले.

Next
ठळक मुद्देकोगनोळीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन टोल चुकवून जाणाऱ्या वाहनांचे फुल देऊन स्वागत

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी अनेक वाहने कोगनोळीतून धोकादायक प्रवास करतात. या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून कोगनोळीकर आक्रमक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज टोल चुकवून गावातून प्रवास करणाऱ्या वाहनांचे गुलाब पुष्प देऊन उपरोधिक स्वागत करण्यात आले.

कोगनोळीतून होणाऱ्या अवैध वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर तोडगा न काढल्यास महामार्ग रोखणार असल्याचे कळवले होते. त्यांनी दहा दिवसात कोणतीही कार्यवाही न केल्याने सहा फेब्रुवारी रोजी महामार्ग रोखण्याचा निर्धार कोगनोळीकरांनी केला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल चुकवून गावातून प्रवास करणाऱ्या वाहनांचे गुलाब पुष्प देऊन उपरोधिक स्वागत करण्यात आले तसेच वाहनांवर स्टिकरही लावण्यात आले.

यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळू कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, ग्रामपंचायतीचे सर्व नूतन सदस्य तसेच गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाहनांना लावले स्टीकर

"गाडी माझी लाखाची, टोल चुकविण्यासाठी रस्ता शोधतो चोरीची" अशा आशयाचे स्टिकर यावेळी अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले.

 

Web Title: Welcome to Koganoli by giving flowers to the vehicles passing through the village by paying the agitation toll in Gandhigiri style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.