घरबांधणी शुल्काबाबत आठवड्यात शासन आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST2021-03-13T04:44:48+5:302021-03-13T04:44:48+5:30
कोल्हापूर ग्रामीण भागातील ३२०० चौरस फुटांपर्यंत घर बांधणीसाठी आता परवानगीची गरज राहणार नाही. मात्र ...

घरबांधणी शुल्काबाबत आठवड्यात शासन आदेश
कोल्हापूर ग्रामीण भागातील ३२०० चौरस फुटांपर्यंत घर बांधणीसाठी आता परवानगीची गरज राहणार नाही. मात्र त्यासाठी जे शुल्क भरावे लागणार आहे त्याचा शासन आदेश येत्या आठवड्यात काढणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ म्हणाले, नगरविकास विभागाने युनिफाईड नियमावली लागू केली आहे. त्याच पद्धतीने आता ग्रामीण भागातही ३२०० चौरस फुटापर्यंत घर बांधताना परवानगीची गरज लागणार नाही. मात्र त्यासाठी बांधकाम आराखडा सादर करावा लागणार आहे. मात्र यासाठी शुल्क भरावे लागेल. कारण त्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मुलभूत सुविधा पुरवल्या जातात. हा निर्णय जरी ग्रामविकास विभागाने घेतला असला तरी अजून शुल्क निश्चितीचा शासन आदेश काढण्यात आलेला नाही. शहर नजिकच्या ग्रामपंचायती, डोंगराळ भागातील ग्रामपंचायती असा विचार करून ही शुल्क निश्चिती करावी लागेल. कारभार करताना ग्रामपंचायतीला ही काही उत्पन्नाची सोय करावी लागेल. त्यामुळेच येत्या आठवड्यात हा शासन आदेश काढण्यात येणार आहे.