माथाडी कामगारांना ईएसआयची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:40+5:302021-03-06T04:22:40+5:30
इचलकरंजी : माथाडी बोर्डाकडे नोंद असलेल्या कामगारांना ईएसआय सुविधा मिळवून देण्यासह त्यांच्या अन्य समस्या आणि अडचणी सोडवू. त्याचबरोबर त्यांना ...

माथाडी कामगारांना ईएसआयची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू
इचलकरंजी : माथाडी बोर्डाकडे नोंद असलेल्या कामगारांना ईएसआय सुविधा मिळवून देण्यासह त्यांच्या अन्य समस्या आणि अडचणी सोडवू. त्याचबरोबर त्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले.
येथील ताराराणी पक्ष कार्यालयात जनरल हमाल कामगार युनियनच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आवाडे म्हणाले, विविध शासकीय योजनांचा लाभ माथाडी कामगारांना मिळावा, यासाठीच माथाडी बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, अशी भावना आहे. ईएसआय व घरकुल अशा विविध कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे ८० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गाठी उचलणार नाही, असा एकजुटीने निर्धार करावा. एकत्रित काम करावे, असे आवाहनही आमदार आवाडे यांनी केले.
यावेळी जनरल हमाल कामगार युनियनच्या अध्यक्षपदी विशाल लाखे तर कार्याध्यक्षपदी शांताराम लाखे यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक नौशाद जावळे यांनी केले. यावेळी ताराराणीचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अजित सलाती, बसाप्पा पुजारी यांच्यासह हमाल उपस्थित होते.