शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

कोल्हापुरात शाहू मिलमधील शाहू महाराजांचे स्मारक लवकरच पूर्ण करू, पालकमंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:04 IST

महासंस्कृती महोत्सवाची सांगता : वस्त्रोद्योगाकडे जागेसाठी पाठपुरावा करणार

कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कोल्हापुरातील शाहू मिल येथे येत्या काळात पूर्ण करू, यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडे जागेसाठी पाठपुरावा करून लवकरच ती हस्तांतरित केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा महासंस्कृती महोत्सवामधून सर्वदूर जाईल, असेही ते म्हणाले.गेल्या पाच दिवसांपासून येथील शाहू मिल येथे सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता रविवारी स्वराज्य-संस्थापक श्रीमंत योगी नाटकाने झाली. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जनतेचं, रयतेचं राज्य राबवून समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला; म्हणूनच आजही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो. त्यांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीतील वारसा विविध सांस्कृतिक महोत्सवांतून पुढील पिढीकडे जायला हवा.’जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपली परंपरा, आपली संस्कृती पुढील पिढीकडे जाते. असे कार्यक्रम पुन:पुन्हा राबविण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन भविष्यातही प्रयत्न करील.’ उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी आभार मानले.यावेळी महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी, अशासकीय सदस्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रमोद पाटील, प्रसाद संकपाळ, ऋषिकेश केसकर, चंद्रकांत पाटील, शेखर वळीवडेकर, तेजस खैरमोडे, उदय गायकवाड, आदींचा समावेश होता. यावेळी महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.मुश्रीफ यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेटशाहू मिल येथील या महासंस्कृती महोत्सवातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला पालकमंत्री मुश्रीफ यांनीही भेट दिली. याशिवाय कलाकार, कारागीर यांनी आपली संस्कृती, आपली हस्तकला आपल्या कलेतून सर्वांसमोर मांडली. गेले पाच दिवस शिवकालीन शस्त्र, हस्तकला, खाद्यसंस्कृती यांसह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीHasan Mushrifहसन मुश्रीफ