शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
3
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
4
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
5
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
6
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
7
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
8
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
9
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
10
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
11
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
12
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
13
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
14
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
15
'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
16
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
17
डेटिंग साईटवर परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला, भरपूर पैसा खर्च केला अन् अचानक 'ती' दिसली समोर! नंतर जे झालं..
18
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
19
Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
20
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या पारंपरिक वस्तू जगभरात नेण्यासाठी करार करू, 'प्राडा'च्या शिष्टमंडळाने दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा

कोल्हापूर : भविष्यात प्राडा कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विविध पातळ्यांवर करार करण्याचा विचार केला जाईल. याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसेच उत्पादक कंपन्यांना कळविण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली.इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली. यावेळी कंपनीचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनिएल कोंटू, बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार, मेघ गांधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी येडगे यांनी चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पलसंबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची तसेच कोल्हापुरी साज, ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती शिष्टमंडळाला दिली.

सांस्कृतिक वारसाजिल्हाधिकारी येडगे म्हणाले,, ‘कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्राणांचा प्रकार असून त्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूरशी जोडला आहे. कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणे नसून, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. त्या स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानल्या जातात. कोल्हापूरशी या चपलांचे भावनिक नाते जोडले गेले आहे.’