शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?, मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:25 IST

कोल्हापूर : लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जमा झाला असून, प्रसंगी विकासकामांना कात्री लावू पण त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे आगामी स्थानिक ...

कोल्हापूर : लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जमा झाला असून, प्रसंगी विकासकामांना कात्री लावू पण त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी २१०० रुपयांप्रमाणे हप्ता देऊ, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांना पाच वर्षांत कर्जमाफी देण्याचे वचन आमच्या जाहीरनाम्यात होते. त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.‘गोकुळ’तर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विधानसभेला लाडक्या बहिणी निर्णायक ठरल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर ‘अहो, येथे सतेज पाटील आहेत’, असे मंत्री मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिले. आमदार सतेज पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे दिलेले आश्वासन तेवढे पूर्ण करा. मी येथे बोलणार नव्हतो, पण अरुण डोंगळे यांनी विषय काढल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनीही जोरदार फटकेबाजी केली.

डेंटल कॉलेज कोल्हापुरात द्यामंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून राज्याचा सगळा आरोग्य विभाग कोल्हापुरात आला आहे. आयुर्वेदिकसह इतर तीन कॉलेज कागलला नेली आहेत, आता बॅकलॉग पूर्ण झाला आहे. यावर, डेंटल कॉलेज कागलला सुरू करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगताच, डेंटल कॉलेज तेवढे कोल्हापुरात काढा, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

डोंगळेंना विधान परिषदेचे वेध..परदेश दाैऱ्यावर अध्यक्ष अरुण डोंगळे जाणार नाहीत, ते विधान परिषदेच्या प्रयत्नात असल्याने थांबल्याचे विश्वास पाटील यांच्याकडून समजल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तर अध्यक्ष डोंगळे परदेशात जाणार नाहीत, याचे कोडे पडल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराजांच्या सत्काराबद्दल ‘गोकुळ’चे आभारमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल ‘गोकुळ’चे आभार मानतो. आम्ही महायुतीसोबत असल्याने त्यांच्याविरोधात काम केले होते, त्यामुळे उघड अभिनंदन करता आले नाही. तसे खासगीत केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला विकासपथावर नेऊ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीHasan Mushrifहसन मुश्रीफladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा