शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:57 IST

प्रसंगी मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची तीव्रता वाढवण्यासाठी कृषीदिनी मंगळवारी (१ जुलै) सकाळी ११ वाजता होणाऱ्या शिरोलीतील महामार्ग रोको आंदोलन सरकारला धडकी भरविणारा होण्यासाठी शहर, जिल्ह्यातून शेतकरी, नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी करण्याचा निर्धार रविवारच्या बैठकीत झाला.येथील अजिंक्यतारा कार्यालयात शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने पूर्व तयारी बैठक झाली. बैठकीस सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी संघटना, निवृत्त प्राध्यापक आणि शिक्षक संघटनेसह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित राहून शक्तिपीठ विरोधी भूमिका मांडून रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आणण्याचे आश्वासन दिले. माजी महापौर आर. के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.उद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठ विरोधात मंगळवारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलाजवळील महामार्ग रोकण्याचे आंदोलन होईल. आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार ताकद लावली आहे. बाधित शेतकऱ्यांसह वाहनधारक, सामान्य लोक, नोकरदारही आंदोलनात सहभागी होतील. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी दडपशाही केली तरी त्याला भीक घालू नये.काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, महामार्ग रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील लोक सहभागी होण्यासाठी माजी नगरसेवकांची मदत घेण्यात येईल. यासाठी माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अनिल लवेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील. कामगार नेते अतुल दिघे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग झाल्यास बाधित शेतकरी संपणार आहे. वाहनधारकांनाही टोलच्या रूपाने झळ बसणार आहे.

किसान काँग्रेसचे सागर कोंडेकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग सरकार आपल्या बगलबच्चांना घेऊन रेटत आहे. वारंवार शेतकऱ्यांना अपमानित केले जात आहे. म्हणून इंडिया आघाडीच्या माध्यमातून महामार्गास तीव्र विरोध करू. उद्धवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी शहरातील मोठ्या संख्येने लोक महामार्ग रोकोत सहभाग करू, असे आश्वासन दिले.यावेळी सतीशचंद्र कांबळे, अनिल घाटगे, रघुनाथ कांबळे, दिलीप पोवार, अभिजित कांबळे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष देसाई, प्रवीण केसरकर यांची भाषणे झाली. बैठकीस ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगुले यांच्यासह इंडिया आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसंगी मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चाकागल तालुक्यातील व्हन्नूर येथील बाधित शेतकरी सुरेश संकपाळ म्हणाले, शक्तिपीठ विरोधासाठी शहरातून व्यापक पाठिंबा मिळतोय, हे आमच्यासाठी मोठा आधार आहे. शक्तिपीठ झाला तर माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणार आहे. म्हणून कागल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. विरोधी भूमिका घेण्यासाठी आम्ही प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चाही काढणार आहे. कागल, भुदरगड तालुक्यांतील बाधित शेतकरी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरी जाऊन शक्तिपीठ महामार्गावर भूमिका जाहीर करा, असा आग्रह धरणार आहे.