शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही गडहिंग्लजकरां’चा महालक्ष्मी यात्रेस विरोध

By admin | Updated: January 21, 2015 23:55 IST

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन : नियोजित यात्रा रद्द करण्याची मागणी

गडहिंग्लज : मे २०१५ मध्ये होणारी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा रद्द करण्यात यावी, अशी मागणी ‘आम्ही गडहिंग्लजकरां’नी शिष्टमंडळाने भेटून निवेदनाद्वारे येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, यात्रेसंदर्भात झालेल्या प्राथमिक बैठकीत बहुसंख्य नागरिक व विश्वस्तांनी यात्रेला विरोध केला असतानाही यात्रा समितीने यात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी शासनाकडून सव्वा कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्याकामाची वर्कआॅर्डर ठेकेदाराला देण्यात आली आहे. यात्रेमुळे हे काम रेंगाळले, तर सरकारी निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.गडहिंग्लज शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे ५० हजार, तर एकूण कुटुंबांची संख्या आठ हजार आहे. सुमारे दहा लाख लोक यात्रेला येण्याची शक्यता आहे. मे मध्ये पाणीटंचाई असते. त्यामुळे आठवडाभर चालणाऱ्या यात्रेत पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य नाही.शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, यात्रेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणे, वाहतूक व गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मिरवणुकीतील चेंगराचेंगरी, महिलांची छेडछाड, चेन स्नॅचिंग व पाकीटमारी, व्यसनी लोकांचा उपद्रव, ध्वनिप्रदूषण, अन्नातून होणारी विषबाधा, अस्वच्छतेमुळे होणारे साथीचे आजार आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार आहे.गडहिंग्लजमधील आठ हजार कुटुंबांना यात्रेसाठी घर दुरुस्ती, रंगरंगोटी, शाकाहारी-मासांहारी भोजन, दारू, पाहुण्यांचा मानपान, आदींसाठी प्रत्येक कुटुंबाला किमान एक लाख रुपये खर्च येणार आहे. बहुसंख्य गरीब नागरिकांना हा खर्च परवडणारा नाही. यात्रेत हजारो कोंबड्या व बोकडांचा बळी दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मौल्यवान पशुधन वाया जाते. दारूच्या वापरामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका आहे.नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आणि मनुष्यबळ लक्षात घेता दहा लाख लोकांची व्यवस्था पालिकेकडून शक्य नाही. शासनाकडून यात्रेसाठी कोणताही खास निधी पालिकेला मिळालेला नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.निवेदनावर अ‍ॅड. दशरथ दळवी, प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. पी. डी. पाटील, उज्ज्वला दळवी, शिवाजीराव नाईक, प्रा. रमेश तिबिले, अलका भोईटे, नीलेश शेळके, शारदा अजळकर, प्रा. शंकर नेर्ले, सुनंदा गुंडे, सविता चव्हाण, ऊर्मिला कदम, आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)देवा-धर्माला विरोध नाहीग्रामदैवत काळभैरी व हाळलक्ष्मीची यात्रा दरवर्षी होते. नवरात्रीत महालक्ष्मी देवीचा उत्सव नऊ दिवस केला जात असल्यामुळे महालक्ष्मी यात्रेचा खर्च व संभाव्य समस्या टाळणे शक्य आहे. आमचा देवा-धर्माला विरोध नाही. मात्र, सामाजिकदृष्ट्या व व्यवहार्य नसलेली नियोजित यात्रा रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.