शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election: सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत; मंत्री हसन मुश्रीफांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:42 IST

महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावा

इचलकरंजी : भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे. महापालिका निवडणुकीसाठी सन्मानजनक जागा दिल्या, तर चर्चा करा. नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देत असतानाच सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत असल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी मराठा सांस्कृतिक भवनमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्यातील काही लोक दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे यांची शक्ती कमी झाली आहे, असा अंदाज घेऊन आमचे मित्रपक्ष चर्चा करायला लागले, तर त्यांचे गणित चुकल्याशिवाय राहणार नाही. कारण राष्ट्रवादीने सातत्याने सत्तेत कसे यायचे, याची किमया करून दाखवली आहे.अनेकजण दुसऱ्या पक्षात जाऊनसुद्धा या शहराने पक्षावर प्रेम केले आहे. पक्षातील नेत्यांनी मित्रपक्षांबरोबर चर्चा जिथेपर्यंत करता येते, तिथेपर्यंत करावी. सन्मानजनक जागा द्याव्यात. तुम्हाला जेव्हा आपला सन्मान होत नाही, अपमान होतो, असे वाटल्यानंतर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. चार उमेदवारांचा एक प्रभाग असतो, हे मित्र पक्षाने लक्षात ठेवावे. सगळ्या पक्षांना आपापली गरज असते, हेही लक्षात ठेवावे.जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी, शहरातील पाणीप्रश्न हाताळण्यासाठी पक्षाने मजबूतपणे रान उठविल्याचे सांगितले. पक्षामध्ये युवक सक्रिय असल्याचे परवेझ गैबान यांनी भाषणात सांगितले. बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, तौफिक मुजावर आदींची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, विलास गाताडे, अमित गाताडे, लतीफ गैबान, बाळासाहेब देशमुख, राजाराम लोकरे, नासीर अपराध, दशरथ माने, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.शहराला स्वच्छ व मुबलक पाणीशहराला स्वच्छ व प्रदूषित नसलेले पाणी देण्याची मी यापूर्वी ग्वाही दिली आहे. ती जबाबदारी टाळणार नाही. तुम्हाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करेन, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif warns BJP: Knows the secret to gaining power in Kolhapur.

Web Summary : Hasan Mushrif advised BJP to discuss respectfully for corporation elections, or prepare to fight independently. He asserted NCP knows the secret to gaining power, despite some members leaving. He guaranteed clean water for the city.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपा