शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयात ‘रेफर’करण्यासाठी आपण नाही; आरोग्य मंत्र्यांनी शासकीय डॉक्टरांची केली कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:55 IST

'तुमच्यासाठी शासन जे-जे शक्य आहे ते करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु तुम्ही जनतेसाठी संपूर्ण योगदान द्या'

कोल्हापूर : खासगी रुग्णालयात रुग्ण रेफर करण्यासाठी आपण नाही आहोत. आपल्या दवाखान्यात रुग्ण येत नाहीत, आले तर थांबत नाहीत, हे डॉक्टर म्हणून आपले अपयश आहे, अशा स्पष्ट शब्दांत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कामचुकार शासकीय डॉक्टरांची सोमवारी कानउघाडणी केली.येथील शासकीय विश्रामगृहावरील शाहू सभागृहात आयोजित शासकीय डॉक्टरांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत ही कार्यशाळा घेण्यात आली.मंत्री आबिटकर म्हणाले, तुमच्यासाठी शासन जे-जे शक्य आहे ते करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु तुम्ही जनतेसाठी संपूर्ण योगदान द्या. आणखी तीन महिन्यांनंतर मी परत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेणार आहे. तामिळनाडूमध्ये दोन्ही आरोग्य योजनांमधील खर्च निधीच्या ६० टक्के निधी शासकीय रुग्णालयांनाच परत मिळतो. कारण, अधिकाधिक रुग्ण शासकीय रुग्णालयातच उपचार घेतात. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण केवळ १२ टक्क्यांवर आहे. तुम्ही जर नागरिकांमध्ये तुमच्याबद्दलचा विश्वास निर्माण केलात, तर हे आपल्यालाही अशक्य नाही.दिवसभरात उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. हेमलता पालेकर, डॉ. उत्तम मदने, डॉ. प्रकाश पावरा यांनी मार्गदर्शन केले.

२८ आजारांवर उपचारमहात्मा फुले योजनेतून शासनाने आता १२०० आजारांमध्ये वाढ करून ती संख्या २३०० पर्यंत नेली आहे. यातील २८ प्रकारच्या आजारांवर या योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार व्हावेत, यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डॉक्टरांनी याची अंमलबजावणी सुरू करावी, असे आवाहनही मंत्री आबिटकर यांनी यावेळी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister scolds doctors for referring patients to private hospitals.

Web Summary : Minister Abitkar criticized government doctors for referring patients to private hospitals, emphasizing their failure to build trust. He urged them to utilize health schemes effectively, aiming for increased treatment at primary centers, as seen in Tamil Nadu.