शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ऑन-ऑफलाईन शैक्षणिक सुविधेसह चाटेची रौप्यमहाेत्सवाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पालकांनी दाखवलेला विश्वास आणि ‘चाटे पॅटर्न’च्या मदतीने विद्यार्थ्यांने घेतलेली ...

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पालकांनी दाखवलेला विश्वास आणि ‘चाटे पॅटर्न’च्या मदतीने विद्यार्थ्यांने घेतलेली यशस्वी भरारी हीच आमची शिदोरी आहे. यावरच पुढेही विद्याथ्र्यांना गरजेनुसार ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देऊ, असे प्रतिपादन चाटे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले. चाटे शिक्षण समूहाची सुरुवात कोल्हापुरात नियोजन, अध्ययन, अध्यापन, बोर्डाची परीक्षा पद्धती, विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांच्या आशा-आकांक्षा, परीक्षा पद्धतीमधील बारकावे, आदर्श उत्तरे यांचा सखोल अभ्यास करून चर्चा, विचारविनिमय करून अनेक प्रयोग केले. त्यातील प्रत्येक प्रयोग म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने यशाची पायरी ठरली.

शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी समूहाने आपली तयारी पूर्ण केली आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर अभ्यासक्रम बदलत आहे. एक भाग म्हणून कोल्हापुरात कात्यायनी परिसरामध्ये २५ एकर जागेमध्ये भव्य चाटे संकुल सुरू केले आहे.

आठवी ते बारावी आणि नीट, जेईई, सीईटी परीक्षामध्ये उज्ज्वल यशाची परंपरा आम्ही अधिक उज्ज्वल करत आहोत. समूहामध्ये क्लासेस, स्कूल, ज्यु. कॉलेज, श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान, आय.आय.टी सेंटर, चाटे पब्लिकेशन्स, चाटे किड्स, चाटे समर व्हेकेशन प्रोजक्ट, चाटे टेस्ट सिरीज या सर्व संस्थांतील नियोजन अधिक उत्कृष्ट ठेवण्यासाठी गुणवत्तेत कधीही तडजोड केलेली नाही म्हणूनच कोल्हापूर विभाग २४व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्थापक प्रा. मच्छिंद्र चाटे आणि प्रा. गोपीचंद चाटे यांचे मार्गदर्शन आणि शिक्षण क्षेत्राची नवी गरज व आव्हाने यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत.

फोटो : १२०४२०२१-कोल-भारत खराटे