शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

हुश्श.. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीत, कोल्हापूरकरांची पाण्यासाठीची धावाधाव थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:45 IST

चौथ्या दिवशी पूर्ण क्षमतेने पाणी

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील बिघाड पूर्णपणे निघाल्याने चौथ्या दिवशी शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाला. अपवादवगळता शहरातील सर्व भागांत पाणी पूर्ण दाबाने वितरीत होत असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासनाने रविवारी दिली.थेट पाईपलाईनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने ऐन गणेशोत्सवात शहरात पाणीबाणी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी महिला, रहिवाशांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले. तातडीने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी जादा कर्मचारी तैनात करून बिघाड काढण्याचे काम युद्धपातळीवर केले.सूरत येथील कंपनीच्या तज्ज्ञ अभियंत्यांची मदतही घेण्यात आली. तांत्रिक दोष पूर्णपणे निघाल्याने योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू झाला आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ३३ केव्ही सबस्टेशन दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर हिटिंग करून पंपिग स्टेशनची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर येथूनही पाणी उपसा सुरळीतपणे सुरू झाला. परिणामी शिंगणापूरमधून ए, बी व ई वॉर्डमधील राजारामपुरी सेक्शन, बालिंगा योजनेतूनमधून सी व डी वॉर्डला आणि काळम्मावाडी योजनेमधून कसबा बावडा तसेच संलग्न ई वॉर्डाला एकाच वेळी दैनंदिन पाणीपुरवठा पूर्ववत केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.काही भागांत टँकरआपटेनगर, जीवबा नाना पार्क, सुलोचना पार्क, साळोखेनगर परिसरात अपुरा पाणीपुरवठा झाला. येथे मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. येथेही आज, सोमवारपासून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.