शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:55 IST

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

राधानगरी : पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धरणातील शिल्लक पाणीसाठा, मोठ्या पाणलोट परिसरामुळे लवकर भरणारे धरण व पावसाचा उच्चांक या कारणामुळे ऑगस्ट महिन्यात महापुराचा कहर झाला होता.    उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे यावर्षी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. साडेआठ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात एप्रिलच्या सुरुवातीला ४.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

दोन महिन्यात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्व औद्योगिक व अन्य कारखाने बंद आहेत. त्यामुळे केवळ शेती आणि पिण्यासाठीच पाण्याचा  वापर सुरु  आहे. परिणामी पाण्याचा वापर कमी होता. 

येथील पाण्याचा विसर्ग जल विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे केला जातो. गेल्या दीड महिन्यात यातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे  उन्हाळ्यातही भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे.

बुधवारी धरणातील पाणीसाठा दोन ०२:२३ टीएमसी व पाणी पातळी २९६ फुटावर आली. या पातळीवर जलविद्युत निर्मिती केंद्राचा पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे धरणाच्या मुख्य दरवाजातून प्रतिसेकंद ९०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.     

सध्या मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा व कोल्हापूर, इचलकरंजी येथील गरज व मागणी पाहून हा विसर्ग करण्यात येईल. पावसाचा अंदाज पाहूनच धरण रिकामे करण्याबाबत निर्णय येणार आहे. विवेक सुतार, शाखा अभियंता,राधानगरी

टॅग्स :radhanagari-acराधानगरीWaterपाणीkolhapurकोल्हापूरriverनदी