कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाई, चार खासगी विहिरी अधिग्रहित 

By समीर देशपांडे | Published: April 8, 2024 06:06 PM2024-04-08T18:06:39+5:302024-04-08T18:07:01+5:30

कोल्हापूर : एप्रिलमध्येच जिल्ह्यात पाणी टंचाईचे वेध लागले असून एकूण चार खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन ...

Water shortage in Kolhapur district, four private wells acquired | कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाई, चार खासगी विहिरी अधिग्रहित 

कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाई, चार खासगी विहिरी अधिग्रहित 

कोल्हापूर : एप्रिलमध्येच जिल्ह्यात पाणी टंचाईचे वेध लागले असून एकूण चार खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन हातकणंगले तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून याबाबत रोज अद्ययावत माहिती घेतली जात असून त्यानुसार महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. प्रभारी जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी वैजनाथ कराड यांनी ही माहिती दिली.   

गतवर्षी कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे भूर्भातच पाण्याचा साठा कमी झाला असुन त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे.  जट्टेवाडी ता. चंदगड, माले, मालेवाडी, अंबपवाडी, मजले ता. हातकणंगले या ठिकाणीही या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नावेली ता. पन्हाळा, कोलिक ता. चंदगड, जकीनपेठ, जागेवाडी ता. भुदरगड या ठिकाणीही पाणी टंचाई निर्माण झाली असून या ठिकाणी नवीन विंधण विहिरी प्रस्तावित आहेत.

Web Title: Water shortage in Kolhapur district, four private wells acquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.