जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:23 AM2019-05-13T00:23:11+5:302019-05-13T00:23:23+5:30

जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीभारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना हे कोल्हापूरकरांचे स्वप्न आहे. ...

The water purification center tested in June | जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

googlenewsNext

जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीभारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना हे कोल्हापूरकरांचे स्वप्न आहे. नैसर्गिक, भौगोलिक, प्रशासकीय तसेच मानवनिर्मित अनेक अडचणी, अडथळे पार करत योजनेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. योजनेतील सगळ्यात जलदगतीने काम पूर्ण होत आहे, ते पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे! प्रतिदिन ८० एम. एल. डी. क्षमतेच्या या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रातील आठ ड्युअल फिल्टर बेड, ४० एम. एल. डी. क्षमतेचे दोन क्लॅरिफायर, स्काडा सिस्टीमसह काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. एवढेच नाही, तर रंगरंगोटीचे कामही सुरू झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी घेतली जाणार आहे.
ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीसमोर मुख्य आव्हान धरणक्षेत्रातील इंटकवेल, जॅकवेल, हेडवर्कचे होते. दुसरे आव्हान होते ५३ किलोमीटर अंतरात जलवाहिन्या टाकण्याचे! ही कामे प्रगतिपथावर आल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सगळ्यात सहजगतीने पुईखडी येथे बांधण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महानगरपालिका प्रशासनाच्या मालकीची असल्याने त्या ठिकाणी काम करण्यास कोणतेच अडथळे नव्हते. ही संधी साधत जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू ठेवले आणि आजमितीस ते पूर्णही झाले आहे.
‘लोकमत टीम’ने या ठिकाणची पाहणी केली तेव्हा तेथील अनेक इमारतीमध्ये टाईल्स बसविण्याचे तसेच रंगरंगोटीचे काम सुरू होते. आठ ड्युअल फिल्टर बेडचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या वरील बाजूला बॅक वॉश टॅँक बांधले जात असून, त्याच्या स्लॅबच्या सळ्या जोडल्या जात आहेत. पुढील आठवड्यात त्यावर स्लॅब टाकला जाणार आहे. ४० एम. एल. डी. क्षमतेचे क्लॅरिफायर बांधून तयार असून, त्यामध्ये पाणी भरण्यात आले असून, कोठे गळती आहे का? याची चाचणी घेतली जात आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. फिनिशिंगची कामे बाकी आहेत. चाचणी घेण्याकरिता हे केंद्र सज्ज झाले आहे.

बिद्री सबस्टेशन येथूनच वीज हवी
पूर्वीच्या मंजूर आराखड्याप्रमाणे बिद्री सबस्टेशन येथून काळम्मावाडी हेडवर्कपर्यंत वीजपुरवठ्याच्या कामाला महावितरणने मान्यता दिली आहे. आता ते बाजूला ठेऊन पुन्हा राधानगरीसारख्या पर्यायी मार्गाने वीजपुरवठा घ्यायचा म्हटला, तर त्यास राज्य, केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.
शिवाय राधानगरीकडून काळम्मावाडीपर्यंत वनविभाग, वन्यजीव विभाग यांची जागा असल्याने या विभागांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे आणि अशा परवानग्या लगेच मिळतील याबाबत शंका आहे.
त्याकरिता मुंबई, दिल्ली अशा वाºया कराव्या लागतील, त्यात वेळ जाईल म्हणून मंजूर असलेल्या बिद्री सबस्टेशन येथूनच वीजपुरवठा लाईन टाकाव्यात, असा आग्रह ‘जीकेसी’चा आहे.

२०४५ सालच्या लोकसंख्येचा विचार
सध्या शहराची लोकसंख्या सहा ते साडेसहा लाख इतकी आहे; त्यामुळे थेट पाईपलाईन योजना राबविताना सन २०४५ मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून त्याचे आराखडे तयार केले आहेत. २०३० मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या ८ लाख ०५ हजार ९९१ तर २०४५ मध्ये ती १० लाख २९ हजार ९६७ च्या घरात पोहोचणार आहे. जवळपास एक लाख ५४ हजार ४९५ इतक्या तरल लोकसंख्याही गृहीत धरण्यात आली आहे. प्रतिदिन १३५ लिटर पाणी, तर तरल लोकसंख्येत प्रतिदिन २० लिटर्स प्रतिदिन पाणी अशा हिशेबाने पाणीपुरवठा करण्यास ही योजना सक्षम आहे.
स्काडा सिस्टीम बसवणार
सध्या बालिंगा व शिंगणापूर योजनेतून शहराला पाणी पुरवठा होत आहे; परंतु रोज किती पाणी उपसा करतो, किती पाण्यावर प्रक्रिया होते, आणि किती पाणी पुरविले जाते, याचा हिशेब ठोकताळ्यावर केला जातो. नेमका आकडा कोणालाच सांगता येत नाही; त्यामुळे उपसा आणि पुरवठा यात मोठे अंतर असूनही पाणी कोठे जाते कळत नाही. म्हणून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब लागावा म्हणून थेट पाईपलाईन अंतर्गत स्काडा सिस्टीम बसवली जात आहे; त्यासाठी एक मोठी सुसज्ज इमारत उभी करण्यात आली आहे. हा कक्ष पूर्णपणे संगणकीकरण प्रणालीवर चालणार आहे. धरणातून पाणी किती उचलले. त्यातील किती पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आले. किती पाणी शुद्धीकरण करून शहरवासीयांना पुरविले याचा तासागणिक हिशेब या कक्षात ठेवला जाणार आहे.
वीजपुरवठ्यासंबंधी संदिग्धता
काळम्मावाडी धरण क्षेत्रात केल्या जाणाºया वीज पुरवठ्याबाबत संदिग्धता निर्माण केली जात असल्याने या कामात अडथळे येत आहेत. पूर्वीच्या आराखड्यानुसार बिद्री सबस्टेशन ते काळम्मावाडी हेडवर्कपर्यंत ३३ के. व्ही. एक्स्प्रेस फिडर घालण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. त्याकरिता सुरक्षा अनामत म्हणून ६९ लाख इतकी रक्कम भरण्यात आली आहे. साहित्याचा पुरवठा करून काम करण्यास २२ जानेवारीला महावितरणने मंजुरी दिली. त्यानुसार अडीच किलोमीटर लांबीचे काम पूर्णही झाले. मात्र हे काम खर्चिक असून, राधानगरी सबस्टेशन येथून ३३ के. व्ही.ची अतिउच्च दाब एक्स्प्रेस फिडर वीज वाहिनी टाकण्याचा दुसरा पर्याय पुढे आणला गेला आहे; त्यामुळे वीज पुरवठ्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

Web Title: The water purification center tested in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.