नृसिंहवाडी : उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे चौथ्यांदा पाणी आले आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास चालू सालातातील तिसरा दक्षिणव्दार सोहळा संपन्न झाला. यावेळी स्नान व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या वतीने ज्यादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.प. नारायणस्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
कृष्णेच्या पातळीत आठ फुटाने वाढ झाली आहे. दक्षिणव्दार सोहळ्यामुळे अनेक भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला. पाऊस आणि धरणक्षेत्रातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.