कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीला येणाऱ्या महापुरावरील उपाययोजनांसाठी करण्यात येणाऱ्या ३ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी गुरुवारी जागतिक बँकेच्या पथकाने राधानगरी धरण, करंजफेण येथील बोगदा, प्रयाग चिखली येथील संगम, सुतारवाड्यात पुराचे पाणी येऊन होणारे नुकसान याची पाहणी केली.शुक्रवारी (दि. २४) कृष्णा नदीला जोडणारे संगम, ओढे यांची पाहणी करत सांगलीला जातील. महापालिकांच्या प्रकल्पासाठी आलेल्या पथकाची आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. करंजफेण बोगद्यातून भोगावती नदीतून दहा हजार क्यूसेक पाणी दुधगंगा नदीपात्रात वळविण्यात येणार आहे. त्याची व प्रयाग चिखली येथे भोगावती- कासारी नदीच्या संगमाची पाहणी केली.कोल्हापूर व सांगलीला येणाऱ्या महापुरावरील कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी बँकेचे पथक पूरप्रवण क्षेत्रातील व पुराला कारणीभूत ठिकाणांची पाहणी व त्यावर पाटबंधारे विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी आले आहेत.
जागतिक बँकेचे युकीयो तानाका, रुमिता चौधरी, विनय कुलकर्णी तसेच मित्रा संस्थेचे संचालक यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर उपस्थित होते.
राधानगरी धरणाची पाहणीगुरुवारी पथकाने राधानगरी धरणाची पाहणी केली. धरणाचे सर्व्हिस गेट उघडले की ते बंद करणे हेच मोठे दिव्य असते. हे काम सोपे करण्यासाठी ते हायड्रोलिक पद्धतीने ऑपरेट केले जाणार आहे. ही पद्धतीने कशी काम करेल याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
सुतारमळा, व्हिनस कॉर्नरची पाहणीकोल्हापुरात पंचगंगेची वाढणारी पाणी पातळी, नंतर शिंगणापूर येथील केटीवेअर म्हणजे काय याची पथकाने घेतली. पुराचा पहिला फटका बसणाऱ्या सुतारमळा परिसरात पाणी कसे वाढत जाते. पुराची तीव्रता, पातळी, बाधित संख्या, पाणी किती राहते याची माहिती पथकाने घेतली.
आज कृष्णेची पाहणीहे पथक आज कृष्णा नदीचे संगम, नदीला मिळणारे ओढे, नाले यांची पाहणी करत पुढे सांगलीला जाणार आहे. दुसरे एक पथक कोल्हापूर, इचलकरंजी व सांगली महापालिकेच्या हद्दीअंतर्गत करायच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला उपस्थित राहतील.