संततधार पावसाने कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:31 PM2021-06-17T17:31:05+5:302021-06-17T17:37:03+5:30

Rain Panhala Kolhapur : पन्हाळा तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक ओढ्या, नाल्याना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कुंभी,कासारी नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या. कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

The water of Kasari river is out of character due to incessant rains | संततधार पावसाने कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर

पन्हाळा तालुक्यात पावसाच्या पाण्यामुळे कासारी नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले.

googlenewsNext
ठळक मुद्देपन्हाळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी संततधार पावसाने कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक ओढ्या, नाल्याना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कुंभी,कासारी नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या. कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पन्हाळा तालुक्यात मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे खरीपच्या पेरण्यांची उगवण चांगली झाली. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर दलदल निर्माण झाली सुरुवातीच्या पावसाच्या दणक्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पावसाची नोंद झाली कोणत्याही नुकसानीची नोंद तालुक्यात झालेली नाही.

गेल्या २४ तासात पावसाची नोंद

पन्हाळा ११०, वाडीरत्नागिरी ९५, कोडोली ९४, कळे १२९, पडळ १०६, बाजारभोगाव १४०, कोतोली १३२ मि.मि.


 

Web Title: The water of Kasari river is out of character due to incessant rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.