घरफाळा थकविणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडणार

By Admin | Updated: July 20, 2014 00:09 IST2014-07-19T23:54:29+5:302014-07-20T00:09:11+5:30

पाण्याची कनेक्शन तोडण्यात यावीत

Water connections will be disconnected for the people of tension | घरफाळा थकविणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडणार

घरफाळा थकविणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडणार

कोल्हापूर : महानगरपालिकेचा घरफाळा थकविणाऱ्या शहरातील मिळकतधारकांची पाण्याची कनेक्शन तोडण्यात यावीत, थकबाकीदारांच्या मालमत्तापत्रकावर बोजा चढवावा, असा आदेश स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी आज महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले. जे मिळकतधारक प्रामाणिकपणे तसेच निर्धारित वेळेत घरफाळा भरतील त्यांना अनुक्रमे चार व दोन टक्के सवलत देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.
मनपा घरफाळा विभागाच्या उत्पन्नवाढ तसेच वसुलीबाबत आढावा घेण्याकरिता सभापती चव्हाण यांनी आज अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, कर निर्धारक व संग्राहक दिलीप कोळी, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते. पुढील आठवड्यात शंभर थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी केली.
घरफाळा वसुलीच्या उद्दिष्टाप्रमाणे जे कर्मचारी काम करतील त्यांना बक्षीस देण्यात येईल आणि जे कर्मचारी कामचुकार करतील, कामामध्ये हयगय करतील, दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात टाळाटाळ करतील अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश सभापती चव्हाण यांनी प्रशासनाला दिले. घरफाळा थकबाकीमध्ये मनपाचे कर्मचारी अगर त्यांचे कुटुंबीय असतील तर त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून थकबाकी वसूल करा, घरफाळा लागू नसलेल्या नवीन इमारती शोधून काढून त्यांच्यावर आकारणी करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. गटनेता शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांनी महापालिकेला नगरोत्थान योजनेसाठी उभे करण्यात येणाऱ्या कर्जासाठी प्रत्येक खात्याची वसुली वाढवावी, अशा सूचना दिल्या. वसुली करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याचे उद्दिष्ट ठरवून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. नगरसेवकांना प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी देण्यात यावी, जर एखाद्या कुटुंबात भाऊबंदकीचा वाद असेल बिले भरली जात नाहीत अशा थकबाकीदारांना त्यांच्या कुटुंबाप्रमाणे स्वतंत्र बिले देण्याची सूचना यावेळी आदिल फरास यांनी मांडली. सभापती चव्हाण यांनी सर्वाधिक वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी अकरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Water connections will be disconnected for the people of tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.