शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निपाणी-कागल महामार्गाची वाताहत; पैशाची उधळण, तवंदीचा डोंगरच केला सपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:44 IST

निपाणी : कागल ते बेळगाव हा सुमारे शंभर किलोमीटरचा चौपदरी महामार्ग सर्वोत्तम म्हणून गणला जात होता. दिल्लीच्या पूंज लॅाईड ...

निपाणी : कागल ते बेळगाव हा सुमारे शंभर किलोमीटरचा चौपदरी महामार्ग सर्वोत्तम म्हणून गणला जात होता. दिल्लीच्या पूंज लॅाईड या कंपनीने २००२ मध्ये पूर्ण केलेला रस्ता अनेक वर्षे वापरता आला असता, मात्र पुणे-बंगळुरु महामार्ग आठपदरी करण्यासाठी सर्वोत्तम रस्त्याची वाताहत झाली आहे. यासाठी पैशाची प्रचंड उधळण चालू आहे.नव्याने करण्यात येत असलेल्या महामार्गावर गाव तेथे फ्लायओव्हर करण्याचे ठरविल्याने कागल ते बेळगावपर्यंत पंचवीसहून अधिक ठिकाणी भले मोठे भराव घालून फ्लायओव्हर बांधण्यात येत आहेत. निपाणीजवळ दोन किलोमीटरचा छोटा तवंदी घाट आहे. या घाटात दोन मोठी वळणे होती. त्या ठिकाणी अपघात होतात म्हणून तवंदीचा डोंगरच फोडण्यात येत आहे. याशिवाय निपाणीकडे येण्यासाठी अडीच किलोमीटर लांबीचा खांबावर उभारलेला फ्लायओव्हर बांधण्यात येत आहे. यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे.तवंदी घाटातील दोन वळणे काढली असती तर हा घाट रस्ता विनाअपघात वापरता आला असता. कागल ते निपाणी या पंचवीस किलोमीटर महामार्गावर आठ ठिकाणी प्रचंड मोठा मातीचा भराव टाकून फ्लायओव्हर बांधले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात माती, खडी आणि दगडांचा वापर चालू आहे. काम चालू असल्याने पर्यायी अरुंद मार्गावरुन सध्या वाहतूक चालू आहे. तो रस्ता पर्यायी असल्याने कच्चा आहे. मोठ्या वाहतुकीमुळे सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात पुन्हा गतिरोधक बसविण्यात आले आहे. पंचवीस किलोमीटरमध्ये दोन्ही बाजूचे चाळीस गतिरोधक आहेत.

दहा मिनिटांचा रस्तापूंज लॅाईडने केलेल्या रस्त्याने कागलजवळील टोल नाक्यावरून दहा मिनिटात निपाणीला मोटारीने पोहोचता येत होते. या रस्त्यावरुन जाताना पोटातील पाणीही हलत नाही, असा अनुभव येत असे.

उत्तम सर्व्हिस मार्गनिपाणी ते कोगनोळी नाक्यापर्यंत महामार्गाला दोन्ही बाजूने उत्तम सर्व्हिस रोड होते. बैलगाड्या, छोटी वाहने, स्थानिक वाहने यावरून ये-जा करीत होती.

गाव तेथे फ्लायओव्हरनिपाणी-कागल मार्गावर सौंदलगा आणि यमगर्णी ही दोनच गावे आहेत; पण आतील दूरवरच्या प्रत्येक गावाकडे वळणाच्या ठिकाणी फ्लायओव्हरच्या भल्या मोठ्या भिंतीच बांधून या भागाचे वाटोळे केले आहे. सौंदलगा गावाला तर दोन मोठे फ्लायओव्हर बांधले गेले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेBengaluruबेंगळूरhighwayमहामार्ग