शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का, नवख्यांना अनेक ठिकाणी संधी; नगरपरिषद, पंचायतीमधील राजकारण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:54 IST

प्रभाग आरक्षण जाहीर  

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगर परिषदा व नगर पंचायतींमधील २६१ जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पडली. आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली आहे, अशा इच्छुकांसाठी काही ठिकाणी संधी निर्माण झाली तर काही जणांचा हिरमोड झाला. प्रस्थापितांना धक्का व नवख्यांना संधी असेही अनेक ठिकाणी झाल्याचे चित्र आहे. निम्म्या म्हणजे १३४ प्रभागांत महिलांचे राज्य असेल. आरक्षण जाहीर झाल्याने नगरपालिका पातळीवरील राजकारण आता तापणार आहे. अनेकांनी जोडण्या लावायला, पैपाहुणे शोधायलाही सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील गडहिंग्लज, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, आजरा, चंदगड, हातकणंगले, वडगाव, कागल, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, हुपरी या १३ नगरपालिकांसाठी बुधवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या नगरपालिकांमध्ये चिठ्ठी पद्धतीने प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. गडहिंग्लजमध्ये ११ महिलांना, शिरोळमध्ये १० महिलांना संधी मिळाली आहे. जयसिंगपूरमध्ये १६ जागा तर कुरुंदवाडमध्ये १३ जागा खुल्या झाल्या आहेत.आजऱ्यात १७ पैकी ९ ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. हातकणंगलेत ४ प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. कागलमध्ये निम्म्या जागांवर महिला आरक्षण पडले आहे. पन्हाळ्यात १० जागांवर महिलाराज असेल. मलकापूर व हुपरीत अनुक्रमे १० व ११ जागा खुल्या झाल्या आहेत.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षणावर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांच्या नजरा याकडे लागून राहिल्या होत्या. खुल्या झालेल्या प्रभागांमध्ये चुरस जास्त असते. महिला आरक्षण पडले आहे, तिथे आता इच्छुक पुरुष उमेदवारांना पर्याय शोधावा लागणार आहे.गेल्या दोन-चार वर्षांपासून तयारी केलेल्या काही जणांची संधी आरक्षणामुळे हुकली आहे, अशांना आता अन्य प्रभागांचा पर्याय बघावा लागेल. महिला आरक्षण पडलेल्या ठिकाणी इच्छुकांच्या कुटुंबातील महिलांची वर्णी लागणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक राजकारणातील गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून, त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.

कुठले झाले आरक्षणअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला-पुरुष

नगर परिषदा : एकूण ८जयसिंगपूर : २६ (१३)गडहिंग्लज : २२ (११)कागल : २३ (१२)कुरुंदवाड : २० (१०)मलकापूर : २० (१०)वडगाव : २० (१०)मुरगूड : २० (१०)पन्हाळा : २० (१०)

नगर पंचायती : एकूण ०५शिरोळ : २० (१०)हुपरी : २१ (११)हातकणंगले : १७ (०९)चंदगड : १७ (०९)आजरा : १७ (०९)एकूण : २६३ (१३४)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Local Body Elections: Established Faces Suffer, Newcomers Gain Ground

Web Summary : Kolhapur's local body elections see a shift as reservation changes create opportunities for new candidates. Many established politicians face setbacks. Women secure significant representation, heating up local politics.