वडगावात वृद्धाची शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:24+5:302021-06-05T04:19:24+5:30
पेठवडगाव : सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या वृद्धाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेश शिवराम सावंत ...

वडगावात वृद्धाची शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या
पेठवडगाव : सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या वृद्धाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेश शिवराम सावंत (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
येथील सिद्धार्थनगर परिसरात सुरेश सावंत हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांचे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असे कुटुंब आहे. सुरेश हे नेहमीप्रमाणे गुरूवारी रात्री झोपण्यासाठी गेले. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शोधाशोध केली असता, सार्वजनिक शौचालयातील खिडकीला त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबतची वर्दी सचिन सुरेश सावंत यांनी दिली आहे.
सुरेश यांना दीड वर्षांपूर्वी उजव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते. दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यापूर्वी त्यांचा कोरोना ॲन्टिजन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अधिक तपास हवालदार बाबासाहेब दुकाने करत आहेत.