कोरोना काळातील वडणगे पॅटर्न संस्मरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:11+5:302021-02-05T07:08:11+5:30
वडणगे : कोरोना महामारीच्या काळात वडणगे गावाने राबविलेला पॅटर्न देशभर मार्गदर्शक ठरला, अनेकांचे यामुळे प्राण वाचले. अनेकांना आर्थिक ...

कोरोना काळातील वडणगे पॅटर्न संस्मरणीय
वडणगे : कोरोना महामारीच्या काळात वडणगे गावाने राबविलेला पॅटर्न देशभर मार्गदर्शक ठरला, अनेकांचे यामुळे प्राण वाचले. अनेकांना आर्थिक संकटात मदत करणारा हा पॅटर्न कायमच स्मरणात राहील, असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. वडणगे ता. करवीर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या कारकीर्दीची त्रिवर्षपूर्ती यानिमित्त सुभाष ग्रुपच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक बी. एच. पाटील होते. आ. जयंत आसगावकर, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वडणगे येथील तळ्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच सचिन चौगले यांनी केली. यावर आ. पाटील यांनी तळ्याच्या सुशोभिकरणाबरोबरच वडणगे गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
आ. जयंत आसगावकर म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे आपल्याला शिक्षक आमदार होण्याची संधी मिळाली असून आपल्या कामातून येणाऱ्या काळात शिक्षक आमदार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू.
यावेळी डॉ. अजित देवणे, बी. डी. चेचर, रवींद्र पाटील, ॲड. नीलेश नरुटे, केवलसिंह रजपूत, आनंदराव पाटील, डॉ. संदीप पाटील, अजित कळके, अध्यक्ष प्रकाश उदाळे, उपाध्यक्ष विनोद सावंत, काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष प्रवीण चौगुले उपस्थित होते.
फोटो : ०२ वडणगे
ओळी:- वडणगे ता. करवीर येथे लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, बी. एच. पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.