शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Election 2019 : कोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 11:45 AM

विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेस विलंब झाला. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान पावसामुळे सकाळीच लावल्या रांगा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेस विलंब झाला. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहर नगर हायस्कूलमधील मतदान यंत्र जवळपास सव्वा तास बंद होते. हे मतदान यंत्र बदलण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे मतदारांना रांगेतच तिष्ठत उभे रहावे लागले.महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ताराबाई पार्क येथील केंद्रीय जी.एस.टी. कार्यालयातील मतदान केंद्रावर आज सकाळी ८.३0 वाजता मतदान केले. दक्षिण मतदारसंघातील उमेदवार अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांनी सकाळीच मतदान केले, मात्र त्यांना स्वत:ला मतदान करता आले नाही. या दोन्ही उमेदवारांचे मतदान अनुक्रमे हातकणंगले आणि कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात आहे.ताराबाई पार्क येथील मतदान केंद्रावर मालती माधव फाटक या ८० वर्षांच्या वृध्देने तर दिव्यांग केंद्रावर सुलोचना कृष्णाजी कुलकर्णी या ८३ वर्षांच्या वृध्देने मतदान केले. दिव्यांग मतदारांसाठी बहुतेक मतदान केंद्रावर व्हील चेअरची सोय करण्यात आली होती. दीपलक्ष्मी विश्वंभर सावंत या दिव्यांग मतदाराने ताराबाई पार्क येथील मतदानकेंद्रावर मतदान केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कसबा बावडा येथील उलपे सभागृहात मतदारांनी पावणेसात वाजल्यापासूनच रांग लावली होती. येथे महिलांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला. पाचगाव येथेही मतदारांची रांग होती. प्रकाश बासराणी यांनी कुटुंबासह मतदान केले.सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल आणि महानगरपालिकेच्या सदगुरु गाडगे महाराज विद्यामंदिर येथील मतदान केंद्रांवर तसेच अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाचगाव परिसरामध्ये पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. मुक्त सैनिक वसाहत वालावलकर हायस्कुलमध्ये मतदानासाठी मतदारांची गर्दी होती. पाचगावसह मोरेवाडी परिसरात मतदानासाठी मतदारांची रिघ लागलेली होती.कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील २१ आणि २२ क्रमांकाच्या सखी आणि आदर्श मतदान केंद्रातही महिलांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लावून मतदान केले. पूर्वा घाटगे, अंकिता माळी, प्रतिक्षा खासनीस, ऐश्वर्या भोगावकर, किरण वाघे या नवमतदारांनीही या मतदानकेंद्रात सकाळीच रांगेत उभे राहून आपले पहिलेवहिले मतदान करण्याची संधी साधली.सकाळी ९ वाजल्यापासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. हातकणंगले राखिव विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.२६ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये १४, २०१ पुरुषांनी, ५,६९७ स्त्रियांनी असे एकूण १९, ८९८ मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले.माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुदाळ (ता.भुदरगड) येथील मतदान केंद्रात मतदान केले. कागल मतदारसंघातील उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल -लिंगनूर दुमाला येथे मतदान केले, त्यानंतर त्यांनी कसबा सांगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली. या मतदार केंद्रात दिव्यांग मतदार लक्ष्मी श्रीपती कांबळे यांनी व्हीलचेअरवरुन मतदान केले. त्यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदान केंद्रापर्यंत नेले. समरजितसिंह घाटगे हे शिंदेवाडी येथे, संजयब् घाटगे यांनी व्हन्नाळी येथे तर खासदार संजय मंडलिक यांनी चिमगाव मध्ये मतदान केले. आमदार सतेज पाटील यांनी सकाळी शाळा नं ११ येथे मतदान केले.सकाळी ११ वाजेपर्यंत २0.५३ टक्के मतदान झाले. चंदगड येथे १६.६३, राधानगरी येथे २४.१0, कागल येथे २८.२0, कोल्हापूर दक्षिणमध्ये १९, करवीरमध्ये २१.१५, कोल्हापूर उत्तर मध्ये १८.२५, शाहूवाडीत २१, हातकणंगले येथे १९, इचलकरंजी येथे १८, आणि शिरोळ येथे २0 टक्के मतदान झाले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९३ टक्के मतदान झाले. चंदगड येथे ८.२५, राधानगरी येथे ६.४0, कागल येथे ८.१0, कोल्हापूर दक्षिणमध्ये ९, करवीरमध्ये १२.२२, कोल्हापूर उत्तर मध्ये ६.२७, शाहूवाडीत ९.३0, हातकणंगले येथे ७, इचलकरंजी येथे ७.0७, आणि शिरोळ येथे ७.0२ टक्के मतदान झाले होते.दरम्यान, पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सकाळीच मतदान केंद्रांची पाहणी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूर