शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
3
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
4
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
5
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
6
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
7
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
8
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
9
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
10
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
11
पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!
12
Gold Silver Price Today: मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीचे दर घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत
13
Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
14
IND vs SA: सुरक्षा भेदून विराट कोहलीच्या पायाला स्पर्श; 'त्या' चाहत्याला शिक्षा झाली का? 
15
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
16
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
17
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
18
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
20
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलले, कागलमध्ये तृतीयपंथी उमेदवार-पोलिसांमध्ये वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:13 IST

तसंच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पक्षाच चिन्ह लावून थेट मतदान केंद्रात येत असल्याचा प्रकारही निदर्शनास आणून दिला

दुर्वा दळवी

कोल्हापूर: जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान कागलमध्ये सकाळी तृतीयपंथी उमेदवार आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं समोर आले.सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कागल शहरातील संत रोहिदास विद्यामंदिर या मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी आणि पोलिसांमध्ये न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलल्याच्या कारणातून वाद निर्माण झाला. तसंच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पक्षाच चिन्ह लावून थेट मतदान केंद्रात येत असल्याचा प्रकारही या उमेदवारांनी निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित राजकीय पक्षांच्या उमेदवार प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या बाहेर काढलं.या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार, करवीर विभागाचे पोलीस उपधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी भेट दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. किरकोळ प्रकार वगळता सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.

दरम्यान, गडहिंग्लज येथे बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. निवडणूक प्रशासनाने बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला रोखले. जिल्ह्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत २८.१२ टक्के मतदान झाले. एकुण २५५७३७ मतदारांपैकी ७१९१२ मतदारांनी मतदान केले आहे.नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणेनगरपरिषद

  • जयसिंगपूर – ४९७४७ पैकी ९०२३, - १८.१४%, 
  • मुरगूड – १०१२८ पैकी ३४०५ -  ३३.६२%, 
  • मलकापूर - ४९३४ पैकी १७५८ - ३५.६३%  
  • वडगाव - २३०४४ पैकी ८११९ - ३५.२३% 
  • गडहिंग्लज- ३०१६१ पैकी ७९६८ - २६.४२%
  • कागल – २८७५३ पैकी ९०३३ - ३१.४२%
  • पन्हाळा - २९६७ पैकी ९५३ - ३२.१२%
  • कुरुंदवाड - २२२२४ पैकी ७५०४ - ३३.७७%
  • हुपरी - २४८०२ पैकी ६४२८ - २५.९२%
  • शिरोळ - २४५३९ पैकी ६५३१ - २६.६१%

नगरपंचायत

  • आजरा -१४६८६ पैकी ४७३७ -  ३२.२६%
  • चंदगड - ८३१५ पैकी २७२० - ३२.७१% 
  • हातकणंगले - ११४३७ पैकी ३७३३ - ३२.६४%
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Local Elections: Tussle over Ballot Unit Change in Kagal

Web Summary : Kagal witnessed a dispute between a transgender candidate and police over ballot unit changes. Political representatives entering polling booths with party symbols were removed. Voting proceeded smoothly after police intervention.