जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:19 PM2020-02-26T13:19:33+5:302020-02-26T13:20:54+5:30

माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

Voting for the 9 Gram Panchayats in the district on March 29 | जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

Next
ठळक मुद्दे ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातसरपंच निवड थेट होणार

कोल्हापूर : माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

तहसीलदारांकडून उद्या, गुरुवारी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार असून, १३ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत (८ मार्चची रविवार व १० मार्चची सार्वजनिक सुट्टी वगळून) अर्ज भरण्याची मुदत राहणार आहे.

१६ मार्चला सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर १८ मार्च दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार राहणार आहे. २९ मार्चला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्चला होणार आहे.
 

 

Web Title: Voting for the 9 Gram Panchayats in the district on March 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.