शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
3
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
4
"पालिका निवडणुकांसाठी शेअर बाजार बंद ठेवणं खराब नियोजनाचं लक्षण," का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
6
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
7
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: "आमचा विजय निश्चित, विरोधी पक्ष उद्या काय सांगायचे? याची प्रॅक्टिस करतायेत" - फडणवीस
8
Fitness Tips: जिमच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या 'या' ७ चुका आजच थांबवा!
9
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
10
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
11
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
12
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
13
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
14
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
15
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
16
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
17
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
18
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
19
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
20
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ

By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2026 10:33 IST

मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, गुरुवारी शहरातील ५९५ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता उत्साहात मतदानास सुरुवात झाली. २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान होत असून, अनेक ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला. सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांमध्ये ९.६४ टक्के मतदान झाले.अनेक प्रभागांमध्ये उमेदवार व निवडणूक यंत्रणेकडून मतदार स्लिपचे वाटप न झाल्याने मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी बूथवर धावपळ करावी लागत आहे. हायटेक यंत्रणेद्वारे मतदार चिठ्ठ्या काढण्याची सुविधा असली, तरी त्याची माहिती नसल्याने अनेक मतदार संभ्रमात आहेत. काही मतदान केंद्रांवर ज्या बूथवर मतदान आहे, त्या यादीतच नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत अनेक मतदार परत फिरताना दिसले.मतदारांची नावे घरापासून दूरच्या मतदान केंद्रांवर गेल्याने पायपीट वाढली आहे. मतदार ॲप संथ असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या. काही ठिकाणी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे, तर काही मतदारांच्या दोन्ही हातांच्या बोटांना शाई लावल्याचे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. डाव्या हाताऐवजी उजव्या हाताला शाई लावल्याने काहींना दोनदा शाई लावावी लागली.

Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसे उमेदवारासमोरच घडला प्रकारखोली क्रमांक चुकीचे पडल्याने अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला. चार मते द्यायची असल्याने मतदानास वेळ लागत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक गोंधळलेले दिसत आहेत. लक्षतीर्थ वसाहतीतील एका मतदान केंद्रावर तीन मशीनवर कालची तारीख दिसत असल्याने मतदान सुरू होण्यास उशीर झाला.प्रभाग ९ मधील एकजुटी मंदिर येथील मतदान केंद्र क्रमांक २९ व ३० येथे सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले. मात्र, १०० मीटर नियम धाब्यावर बसवत मतदान केंद्रांसमोरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्याने तणाव निर्माण झाला. हरकत घेतल्यानंतर तैनात पोलिसांनी वाहने हटवली. या केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या.एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विभागली गेल्याने मतदारांचा वेळ व ऊर्जा खर्ची पडत आहे. केंद्राबाहेर यादी तपासण्याची सोय नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू आहे. या सगळ्या गोंधळामुळे अनेक मतदारांमध्ये नाराजी व मनस्ताप व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Voting 2026: Enthusiastic Turnout, Glitches Cause Voter Discomfort

Web Summary : Kolhapur witnessed enthusiastic voting for municipal elections amid voter list and booth confusion. Long queues formed early, but issues like misplaced names, distant centers, and ink problems caused frustration. Voters faced difficulties finding their names and expressed dissatisfaction with the process.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान