वाणी हेच शिक्षकांचे सामर्थ्य

By Admin | Updated: December 16, 2014 23:42 IST2014-12-16T22:55:34+5:302014-12-16T23:42:31+5:30

मकरंद गोंधळी : गडहिंग्लज मुख्याध्यापक संघटनेतर्फे पुरस्कार वितरण

Voice is the power of teachers | वाणी हेच शिक्षकांचे सामर्थ्य

वाणी हेच शिक्षकांचे सामर्थ्य

गडहिंग्लज : शिक्षकांचा आवाज हृदयाला भिडणारा असेल, तरच विद्यार्थ्यांचे हृदय पाझरू शकेल. आवाज हेच शिक्षकांचे भांडवल असून, वाणी हेच त्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी. जी. काटे होते. येथील माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यापसंगी के. बी. पोवार, आर. वाय. पाटील, जे. डी. पाटील, दत्ता देशपांडे, शशिकला पाटील व विश्वास रेडेकर यांचा सत्कार झाला. यावेळी विनोद नाईकवाडी, वसंतराव पाटोळे, एम. के. सुतार, ए. डी. देसाई, पी. ए. देशमुख, हिंदुराव नौकुडकर, बाळासाहेब कुपटे, रवींद्र शिवूडकर, तुकाराम पाटील, दिनकर पाटील, टी. बी. चव्हाण, सदानंद वाली, शैलेश पाटील, एस. आर. पाटील, सी. आर. देसाई, शमा कुरणे, अंजली घुळाण्णावर, आदी उपस्थित होते.
राजेंद्र खोराटे यांनी स्वागत, जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक, तर के. बी. पोवार यांनी अतिथी परिचय करून दिला. रमेश देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


४१ विद्यार्थ्यांचा गौरव
शिष्यवृत्तीधारक १०, ११ वी १२ वी परीक्षेतील यशवंत १४ व राष्ट्रीय खेळाडू १६ मिळून ४१ विद्यार्थी, १०० टक्के निकालाबद्दल १७ माध्यमिक व ४ कनिष्ठ महाविद्यालयांचा आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला.
तीन शाळा, तीन मुख्याध्यापकांना पुरस्कार
आदर्श विद्यालय सिरसंगी, चाळोबा विद्यालय सातवणे व दादा देसाई हायस्कूल इंचनाळ यांचा स्वच्छ, सुंदर हिरवी शाळा, तर एस. के.पाटील महागोंड, सी. जे. देसाई किणी, राजेंद्र खोराटे हिडदुगी यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Web Title: Voice is the power of teachers