विवेकानंद महाविद्यालयाने पटकाविले सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:35+5:302021-07-30T04:26:35+5:30

कोल्हापूर : विविध १९ कलाप्रकारांमधील दमदार सादरीकरणाच्या जोरावर विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ४० व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे सर्वसाधारण ...

Vivekananda College won the general title | विवेकानंद महाविद्यालयाने पटकाविले सर्वसाधारण विजेतेपद

विवेकानंद महाविद्यालयाने पटकाविले सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर : विविध १९ कलाप्रकारांमधील दमदार सादरीकरणाच्या जोरावर विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ४० व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या महाविद्यालयाने माजी कुलगुरू आप्पासाहेब पवार चांदीचा फिरता चषक मिळविला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सात महाविद्यालयांनी विभागवार विजेतेपदावर नाव कोरले. त्यांनी विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी महोत्सव विभागवार विजेतेपदाचा फिरता चषक मिळविला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने यावर्षीचा जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सव ऑनलाईन पध्दतीने घेतला. त्यातील मध्यवर्ती महोत्सवाचा अंतिम निकाल विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. विभागवार विजेतेपद मिळविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा, कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर, सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेज विद्द्यानगर कऱ्हाड (वाङ्मय विभाग), देशभक्त रत्नाप्पा कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर (संगीत विभाग), मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली (नृत्य विभाग), ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा, केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोकुळ शिरगाव (नाट्य विभाग), मुधोजी कॉलेज फलटण (कला विभाग) यांचा समावेश आहे.

विजेतेपद प्रदान करण्याचा कार्यक्रम विद्यापीठाकडून घेण्यात येईल, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.

चौकट

कलाप्रकारनिहाय विजेते विद्यार्थी...

वक्तृत्व मराठी (विजेत्यांची नावे अनुक्रमे प्रथम, दि्वतीय, तृतीय, उत्तेजनार्थ) : श्वेता कारंडे, स्नेहा पाटील, स्वरदा फडणीस, पूजा जंबगी. हिंदी : साईसिमरन घाशी, रुबिणा मुल्ला, प्रणव भोसले, श्रुती सुतार. इंग्रजी : कल्याणी सव्वाशे, निहारिका शेट्टी, कनक सिंग. सुगम गायन : प्रतीक्षा पोवार, दीपाली गायकवाड, चारुकेशी चव्हाण, कैवल्य पाटील, शीतल पोतदार, प्राजक्ता पुजारी. शास्त्रीय गायन : सनिका फडके, भैरव किरपेकर, शीतल पोतदार. पाश्चिमात्य एकल गायन : चारूकेशी चव्हाण, वरुण तिवारी, कणक सिंग. शास्त्रीय सूरवाद्य : ऋतुराज धूपकर, ओंकार सुतार, मयुरेश शिखरे. शास्त्रीय तालवाद्य : मयुरेश शिखरे, प्रथमेश पोतदार, ऋषिकेश गुरव. पाश्चिमात्य एकल वाद्यवादन : ऋषिकेश गुरव, मयुरेश शिखरे, प्रथमेश जंगम. शास्त्रीय नृत्य : वेदिका कुष्टे, रितिका निने, सार्थक भिलारी, मनाली संकपाळ. नकला : ओमेश तोगलवार, गणेश चिंचकर, प्रकाश कोळी, रविराज भिसे. एकपात्री अभिनय : स्वरदा फडणीस, सौरभ कराडे, आकाश पाटील, शामल टकले. व्यंगचित्रे : अतुल कापडे, तेजस्विनी डाळे, सुगंधा धनवडे. भित्तीचित्र : प्रतिभा दुंडगे, तृप्ती पटेल, ऐश्वर्या पवार. स्थळचित्र : गुरुनाथ म्हातुगडे, ऋषिकेश रजपूत, कुणाल माने. कातरकाम : केवल यादव, विवेक कांबळे, सुचिता तारळेकर. मातीकाम : कुणाल महोरकर, सानिका मिटके, कौस्तुभ शिरसट. रांगोळी : सुनील कुंभार, ओमकार शिरगुप्पर, निकिता पवार. मेहंदी : प्रणोती पाटील, कोमल कांडेकर, बुशरा शेख.

Web Title: Vivekananda College won the general title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.