कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीचे विश्वास पाटील अध्यक्ष

By Admin | Updated: June 27, 2017 18:24 IST2017-06-27T18:24:02+5:302017-06-27T18:24:02+5:30

राज्य अधिस्वीकृती समितीचे शिक्कामोर्तब

Vishwas Patil's President of Kolhapur Divisional Sanveokicharan Committee | कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीचे विश्वास पाटील अध्यक्ष

कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीचे विश्वास पाटील अध्यक्ष

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २७ : कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत ही निवड झाली. या निवडीवर राज्य अधिस्वीकृती समितीने शिक्कामोर्तब केले आहे.

पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबद्दल शासनाला सूचना करणे व विभागाच्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांच्या अधिस्वीकृती पत्रिकेसाठीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असतात. कोल्हापूरसह सांगली व सिंधुदूर्ग जिल्हे असे समितीचे कार्यक्षेत्र आहे.

माळी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. विश्वास पाटील यांचे नांव सदस्य पत्रकार विजय कुंभार यांनी सुचविले व श्री. माळी यांनी त्यास अनुमोदन दिले. राज्य समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडीला मंजुरी देण्यात आली. समितीचा कालावधी नोव्हेंबर २0१८ पर्यंत आहे.

नूतन अध्यक्ष पाटील हे गेली २३ वर्षे पत्रकारितेत आहेत. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम करून दाखविले आहे. त्यांना राज्य शासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारासह विविध पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत. समितीचे सचिव व माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. 

Web Title: Vishwas Patil's President of Kolhapur Divisional Sanveokicharan Committee