विश्वास कांबळे यांचा ‘शिक्षण जागर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:42+5:302021-01-18T04:21:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : येथील डॉ. डी.वाय. पाटील मराठी काॅन्व्हेंट स्कूलचे उपक्रमशील शिक्षक विश्वास बसाप्पा कांबळे (चन्नेकुपी) यांना ...

Vishwas Kamble's 'Shikshan Jagar' award | विश्वास कांबळे यांचा ‘शिक्षण जागर’ पुरस्कार

विश्वास कांबळे यांचा ‘शिक्षण जागर’ पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी : येथील डॉ. डी.वाय. पाटील मराठी काॅन्व्हेंट स्कूलचे उपक्रमशील शिक्षक विश्वास बसाप्पा कांबळे (चन्नेकुपी) यांना ‘शिक्षण जागर’ पुरस्काराने शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते.

जागतिक शिक्षक दिनानिमित्त राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ‘शिक्षण जागर’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कांबळे यांनी केलेल्या भरीव शैक्षणिक उठाव कार्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह देऊन त्यांचा सहकुटुंब गौरव करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील,

शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर संजय मोहिते, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, गोड साखर गडहिंग्लजचे माजी चेअरमन प्रकाश चव्हाण, राज्याध्यक्ष भरत रसाळे, संपर्कप्रमुख आनंदा हिरुगडे, सचिव शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, मुख्याध्यापिका शीतल बरगे आदींची उपस्थिती होती.

फोटोः

उपक्रमशील शिक्षक विश्वास कांबळे यांचा गौरव करताना शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड. शेजारी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, भरत रसाळे.

Web Title: Vishwas Kamble's 'Shikshan Jagar' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.