शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडावरील आंदोलन : पर्यटकांना मद्यपानापासून रोखण्याचे प्रयत्नदारूबंदीसाठी महिला सरसावल्या

By admin | Updated: July 27, 2014 23:05 IST

गेली तीन महिने पर्यटकांजवळची दारू पकडून नष्ट

राजू कांबळे - मलकापूर , सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर दारूबंदीसाठी मोलमजुरी करणाऱ्या रणरागिनी पुढे आल्या आहेत. गेली तीन महिने पर्यटकांजवळची दारू पकडून नष्ट केली जात आहे. त्यांना सामाजिक संघटनांच्या पाठबळाची गरज आहे. शाहुवाडी पोलिस सहकार्य करीत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा पोलिस प्रमुखांकडे न्याय मागणार असल्याचे वैशाली कांबळे यांनी सांगितले. कोल्हापूरच्या शिवशक्ती प्रतिष्ठानने या महिलांना पावसाळी रेनकोट, चप्पलांच्या जोडी, औषधोपचार पेटी आदी वस्तू भेट दिल्या आहेत. किल्ले विशाळगडावर दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाणाला सर्व धर्मांचे लोक भेट देतात. मात्र येथे गडाला भेट देण्याच्या नावाखाली मद्यपान केले जाते. गेल्या सहा महिन्यापासून गजापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी संघटीत होऊन दारूबंदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गजापूर-विशाळगड येथील पर्यटकांची दारू पकडून नष्ट केली जाते. पोलिसांत तक्रार दिली जाते. मात्र या महिलांना येथील दारू विक्रेत्याकडून धमक्या मिळत आहेत. शाहूवाडी पोलिस सहकार्य करीत नाहीत. तरीही या महिलांनी दारूबंदीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या दारूमुळे गजापूर येथील ५०तरुणांनी आपला जीव गमावला आहे. पर्यटकांच्या दारुचा येथील समाजजीवनावर परिणाम होत आहे. काहीही झाले तरी विशाळगडावर दारूबंदी करणार असा निर्धार या महिलांनी केला. आहे. दारूबंदी साठी प्रयत्न करणाऱ्या या महिलांना जिल्ह्यातील सामाजिक संघटना यांनी पाठबळ देणे गरजेचे आहे. मोलमजुरी करून आम्ही सामाजिक बांधीलकी म्हणून हे काम हाती घेतली आहे. दारूमुळे कुटुंबे उद्धवस्त होत आहेत याची झळ आम्हाला देखील बसली आहे. दररोज गडावर हमाली करतो या कामातून वेळ काढून आम्ही पर्यटकांजवळची दारू नष्ट करतो प्रसंगी आम्हाला शिवीगाळ, हाणामारी देखील होते. असे वैशाली कांबळे यांनी सांगितले. दारूबंदीसाठी वैशाली कांबळे, सुशिला कांबळे, शिला कांबळे, कोंडाबाई कांबळे, आवडाबाई कांबळे, तानाबाई कांबळे, या महिला दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या आहेत.