विविध उपक्रमांनी विशाल सूर्यवंशी यांचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:50+5:302021-09-02T04:50:50+5:30
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे शंभर दात्यांनी रक्तदान केले. उपक्रमाचा प्रारंभ नगराध्यक्ष राजेखान जमादार, किशोरकुमार ढेरे, कुमार ढेरे, ...

विविध उपक्रमांनी विशाल सूर्यवंशी यांचा वाढदिवस
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे शंभर दात्यांनी रक्तदान केले.
उपक्रमाचा प्रारंभ नगराध्यक्ष राजेखान जमादार, किशोरकुमार ढेरे, कुमार ढेरे, महादेव कानकेकर, अमर सनगर, विकी साळोखे, किरण मडीलगेकर आदी प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला. तर साईबाबा गणेश तरुण मंडळाच्या वतीने विशाल सूर्यवंशी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे वडिलांना पोरकी झालेल्या सारंगी धुमाळ हिचे वृत्त दैनिक लोकमतमधून प्रसारित झाले होते. याची नोंद घेत इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने तिला पंचवीस हजार रुपयांचा निधी दिला.
स्वागत रोहित कोळेकर यांनी केले तर प्रास्ताविक संग्राम साळोखे यांनी केले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सूर्यवंशी हे नगरसेवक आहेत; पण खरे जनतेचे सच्चे सेवक आहेत. नागरिकांच्या घरी जाऊन समस्या सोडवणारा नगरसेवक म्हणून सूर्यवंशी याची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी असेच सामाजिक कार्याचा वसा सुरू ठेवावा, अशी विंनती केली. यावेळी विशाल सूर्यवंशी, विकी साळोखे, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव कानकेकर, सहा पोलीस उप निरीक्षक किशोरकुमार खाडे व कुमार ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ
मुरगूड येथील सारंगी धुमाळ या चिमुरडीला पंचवीस हजारांची मदत सुपूर्त करताना राजेखान जमादार, विशाल सूर्यवंशी, विशाल रामशे, आकाश दरेकर, रवीण दाभोळे, महादेव कानकेकर आदी.