शरीरसौष्ठव स्पर्धेत विशाल सिन्हाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:16+5:302021-02-05T07:13:16+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बाॅडी बिल्डर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेजचा विद्यार्थी विशाल सिन्हा ...

शरीरसौष्ठव स्पर्धेत विशाल सिन्हाची बाजी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बाॅडी बिल्डर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेजचा विद्यार्थी विशाल सिन्हा याने प्रथम क्रमांक पटकावला.
शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेचा निकाल असा, ५५ किलो गट - सचिन कांबळे, श्रीकांत नाईक, अवी जाधव, ६० किलो गट - मारुती पाटील, नामदेव जोगदंडे, विनीत देसाई, ६५ किलो गट - विशाल पाटील, सुरज सूर्यवंशी, मोहसीन अथणीकर, ७० किलो गट- जयसिंग नाईक, रजत संकपाळ, रोहन पाचंगे, ७५ किलो गट - विशाल सिन्हा, यश माधाळे, करण काकडे यांनी बाजी मारली. यावेळी पंच म्हणून डाॅ. प्रफुल्ल हळदणकर, दुर्गाप्रसाद दासरी, ओम सातपुते, राहुल परिट यांनी जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेचे आयोजन बिभीषण पाटील यांनी केले होते.