शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

बंदला हिंसक वळण, कोल्हापुरात तणाव; घरे, दुकानांवर दगडफेक, जमावाला पांगवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 6:19 AM

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, शहरात शांतता आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेट्स मुस्लिम समाजातील दोन युवकांनी लावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक देत छत्रपती शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूर शहरात  खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते गुरुवारी (८ जून ) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ३१ तासांच्या कालावधीकरिता खंडित करण्याचे आदेश गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत.

शहरात शिवाजी चौक, माळकर तिकटी, पापाची तिकटी, अकबर मोहल्ला, मेढे तालीम, सोमवार पेठ, काळाईमाम, बाराईमाम, बिंदू चौक, बागवान गल्ली येथे तोडफोड झाली.

स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कायदा कोणीही हाती घेऊ नये. अचानक औरंगजेबाचे समर्थक कुठून आले? याच्या मागे कोण आहे? जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्था कोणी बिघडवत आहे का? याचा शोध घेतला जाईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

एखाद्या मेसेजवरून त्याला धार्मिक स्वरूप दिले जाते, कोल्हापूर बंद पाळला जातो,  आणि सरकार त्याला प्रोत्साहन देते, ही गंभीर बाब आहे. कायदा आणि सुव्यवस्था पाळणे हे सरकारचे काम आहे.  - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर