लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघन ; सहा जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:27 IST2021-05-20T04:27:42+5:302021-05-20T04:27:42+5:30

कुरुंदवाड येथून तवेरा मोटारीतून आंबे विक्रीसाठी आलेल्या रमजान सुलतान बागवान (वय ३७), राज अस्लम हुक्केरी (वय १९), ईस्माइल कुतबुद्दीन ...

Violation of lockdown restrictions; Crimes against six people | लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघन ; सहा जणांवर गुन्हे

लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघन ; सहा जणांवर गुन्हे

कुरुंदवाड येथून तवेरा मोटारीतून आंबे विक्रीसाठी आलेल्या रमजान सुलतान बागवान (वय ३७), राज अस्लम हुक्केरी (वय १९), ईस्माइल कुतबुद्दीन फकिर (वय २६, सर्व रा. कुरुंदवाड) या तिघांवर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडील ६० हजार रुपये किमतीची मोटार जप्त केली. पोलीस ठाण्यासमोर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे विनापरवाना मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी राजू गोविंद म्हेत्रे (वय ५६, रा. दत्तनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील मोबाईल व मोटारसायकल असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विक्रमनगर बालाजी चौकातील किराणा दुकान सुरु ठेवल्याने संतोष जंबू वडगांवे (वय ४८, रा. विक्रमनगर) याच्यावर गुन्हा दाखल केेेला आहे. तर संचारबंदी असताना शहरात विनाकारण व

विनामास्क फिरताना आढळल्याने सचिन केरबा वरुणकर (वय ४0, रा. टाकवडे वेस) याच्यावर कारवाई करत असताना त्याने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Violation of lockdown restrictions; Crimes against six people